Aditi Tatkare On Ladki Bahin Yojna | 80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण, म्हणाल्या….
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सुमारे 80 लाख महिलांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. या आरोपांना उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सुमारे 80 लाख महिलांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. या आरोपांना उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांशी संवाद साधताना तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेतील अर्ज बाद करण्यात आलेले नाहीत. लाभार्थ्यांची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रिया सुरू असल्याने काही नोंदींची तपासणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, ई-केवायसी प्रक्रिया मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात आली होती. यासाठी लाभार्थ्यांना सुमारे तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता.
तटकरे यांनी स्पष्ट केले की, ई-केवायसी ही प्रक्रिया केवळ लाडकी बहीण योजनेसाठी नसून राज्यातील विविध डीबीटी (Direct Benefit Transfer) योजनांमध्येही राबवली जाते. तसेच 80 लाखांचा आकडा केवळ ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांचा नसून त्यामध्ये इतर निकषांमुळे अपात्र ठरणाऱ्या महिलांचाही समावेश आहे. यामध्ये वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी, वयोमर्यादेच्या निकषात न बसणाऱ्या महिला आणि सरकारी कर्मचारी यांचा देखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी कर्मचाऱ्यांकडून लाभाची रक्कम परत वसूल करण्याची प्रक्रिया गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांबाबत सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
Published on: Jun 01, 2026 02:27 PM
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?

