AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी नंदनवन निवासस्थानी दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग
Jayant Patil, Eknath ShindeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 16, 2026 | 10:04 PM
Share

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी नंदनवन निवासस्थानी दाखल झाले आहे. त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड देखील असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यात बैठकीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाबद्दल सध्या राजकीय वर्तुळात वेगवेळ्या चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचं देखील बोललं जात आहे. या सर्व चर्चा सुरू असतानाच आता जयंत पाटील हे एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी नंदनवन निवासस्थानी पोहोचल्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

अर्ध्या तासापासून बैठक 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जयंत पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यावर पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड देखील असल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या अर्धा तासापासून बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाबद्दल विविध चर्चा सुरू आहेत, ते एनडीसोबत जाणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. वर्षावर ही भेट झाली होती. या भेटीवेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील उपस्थित होते. त्यानंतर आता जयंत पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दोनच दिवसांच्या आत जयंत पाटील यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात काही मोठं घडणार आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आजची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उरण-ईश्वरपूर नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असल्याने याच संदर्भात जंयत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याची माहिती आता समोर येत आहे. नगरध्यक्षांवर करण्यात आलेली अपत्रतेची कारवाई ही बेकायदेशीर आहे, याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जयंत पाटील यांनी दिल्याची माहिती देखील आता समोर येत आहे.

Follow Us
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट