70 चित्रपट आणि 20 मालिकांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्रीला नाव नाही तर चेहरा पाहून ओळखायचे लोक, कारण ऐकून…
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील या अभिनेत्रीने 70 चित्रपटांमध्ये आणि 20 मालिकांमध्ये काम करून देखील तिला मिळाली नाही ओळख. कोण आहे ही अभिनेत्री कोण?

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री रीता भादुरी यांना अनेकदा जया बच्चन यांची बहीण समजले जात असे. मात्र, दोघींमध्ये केवळ 'भादुरी' हे आडनाव समान होते; त्यांच्यात कोणतेही कौटुंबिक नाते नव्हते. या गैरसमजामुळे रीता भादुरी अनेकदा नाराजही होत असत.

2010 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी, इतकी वर्षे चित्रपटसृष्टीत काम करूनही लोक मला जया भादुरींची बहीण समजतात अशी खंत व्यक्त केली होती. 1968 मध्ये 'तेरी तलाश में' या चित्रपटातून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली.

त्यानंतर 'आयना', 'जूली', 'सावन को आने दो', 'अनुरोध', 'बेटा', 'हम आपके हैं कौन', 'राजा', 'क्या कहना' आणि 'कभी हाँ कभी ना' यांसारख्या चित्रपटांत त्यांनी प्रभावी सहाय्यक भूमिका साकारल्या.

चित्रपटांप्रमाणेच त्यांनी छोट्या पडद्यावरही आपली वेगळी ओळख निर्माण केली. 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'साराभाई वर्सेस साराभाई', 'कुमकुम', 'अमानत', 'ससुराल गेंदा फूल' आणि 'निमकी मुखिया' या मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या.

सुमारे 70 चित्रपट आणि 20 हून अधिक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करणाऱ्या रीता भादुरी यांना 'राजा' चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्काराचे नामांकनही मिळाले होते. तरी देखील लोक त्यांना ओळखत नव्हते.