70 च्या दशकातील सुपरस्टार राजकुमारीच्या प्रेमात झालेला वेडा, एका रात्रीत पत्नी-मुलांना सोडलं, पण शेवटी…
70 च्या दशकातील हा सुपरस्टार राज कुमारीच्या प्रेमात झालेला वेडा. एका रात्रीत आपल्या पत्नी आणि मुलांना सोडून गेलेला राज कुमारीकडे. शेवटी गर्लफ्रेंडपासून झाला वेगळा. पत्नीने दिला घटस्फोट.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि निर्माते फिरोज खान हे धर्मात्मा, कुर्बानी आणि जांबाज यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या व्यावसायिक यशाइतकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही अनेक चढ-उतारांनी भरलेले होते.
1960 च्या दशकाच्या सुरुवातीला एका पार्टीत त्यांची भेट सुंदरी यांच्याशी झाली. पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 1965 मध्ये त्यांनी विवाह केला. या दाम्पत्याला लैला खान आणि फरदीन खान अशी दोन मुले झाली. सुरुवातीला त्यांचा संसार आनंदात सुरू होता.
मात्र, कामानिमित्त फिरोज खान बंगळुरूमध्ये अधिक काळ राहू लागले. तेथे त्यांची ओळख हैदराबादच्या राजघराण्यातील ज्योतिका धनराजगीर यांच्याशी झाली. या मैत्रीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाल्याची चर्चा होती. काही वर्षांनंतर ही बाब सुंदरी यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी पतीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत त्यांनी भावनिक संघर्षातून बाहेर पडण्यासाठी जवळपास वर्षभर लागल्याचे सांगितले होते.
1985 मध्ये दोघांचा अधिकृत घटस्फोट
दरम्यान, ज्योतिका यांनी फिरोज खान यांच्याकडे विवाहाची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, फिरोज यांनी त्यास कधीही संमती दिली नाही. अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर ज्योतिका यांनी हे नाते संपवून परदेशात जाण्याचा निर्णय घेतला.
यानंतर फिरोज खान पुन्हा मुंबईत आपल्या कुटुंबाकडे परतले आणि संसार पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुंदरी यांनी स्वतःचे आयुष्य नव्याने उभे केले होते. अखेर लग्नाच्या सुमारे 20 वर्षांनंतर, 1985 मध्ये दोघांचा अधिकृत घटस्फोट झाला. त्यानंतर दोघांनीही दुसरे लग्न केले नाही.
फिरोज खान यांचे कर्करोगाने बंगळुरूमध्ये निधन
त्यांचा मुलगा फरदीन खान पुढे बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाला. नो एंट्री चित्रपटातून त्याने लोकप्रियता मिळवली. मात्र, 2001 मधील अंमली पदार्थ प्रकरणानंतर त्याच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला. दीर्घ काळ चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर त्याने 2023 मध्ये विस्फोट या चित्रपटातून पुनरागमन केले.
फिरोज खान यांचे 27 एप्रिल 2009 रोजी कर्करोगाने बंगळुरूमध्ये निधन झाले. आयुष्याची अखेरची वर्षे त्यांनी त्याच शहरात घालवली, जिथे त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या वैयक्तिक घडामोडींना सुरुवात झाली होती. त्यांच्या कथित प्रेमसंबंधांबाबत त्यांनी सार्वजनिकरीत्या कधीही स्पष्ट कबुली दिली नव्हती.