हे गाणं पाहण्यासाठी रविवारी टीव्हीसमोर व्हायची गर्दी, इतकं रोमँटिक की 34 वर्षांनंतरही क्रेझ कायम

34 वर्षांपूर्वीचं हे गाणं ऐकण्यासाठी लोक रविवारपर्यंत बघायचे वाट. पाहण्यासाठी टीव्हीसमोर व्हायची प्रचंड गर्दी. आजही हे गाणं ऐकताच ताज्या होतात जुन्हा आठवणी.

हे गाणं पाहण्यासाठी रविवारी टीव्हीसमोर व्हायची गर्दी, इतकं रोमँटिक की 34 वर्षांनंतरही क्रेझ कायम
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 02, 2026 | 5:09 PM

जुनी हिंदी गाणी म्हटली की अनेकांच्या मनात आठवणींचा खजिना उघडतो. एखादं गाणं जुन्या प्रेमाची आठवण करून देतं तर काही गाणी बालपणीच्या दिवसांत घेऊन जातात. विशेषतः 90 च्या दशकात दूरदर्शनवरील ‘रंगोली’ आणि ‘चित्रहार’ यांसारख्या कार्यक्रमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहायचे. या कार्यक्रमांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या गाण्यांची एक वेगळीच क्रेझ होती. असंच एक रोमँटिक गाणं आजही संगीतप्रेमींच्या मनावर राज्य करत आहे.

1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जान तेरे नाम’ या चित्रपटातील ‘हम लाख छुपाएं प्यार मगर’ हे गाणं आजही लोकप्रिय आहे. कुमार सानू आणि आशा भोसले यांच्या सुरेल आवाजातील या गाण्याने त्या काळातील तरुणाईला अक्षरशः वेड लावलं होतं. रविवारच्या दिवशी टीव्हीवर हे गाणं पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असायचे.

Loading...

‘छुप छुप के मिलने से मिलने का मजा तो आएगा’ ही या गाण्यातील ओळ आजही अनेकांच्या ओठांवर असते. प्रेमातील गोडवा, लपूनछपून भेटण्याची उत्सुकता आणि रोमँटिक भावना या गाण्यातून सुंदरपणे व्यक्त करण्यात आल्या आहेत.

नदीम-श्रवण यांच्या संगीताची जादू

या गाण्याला संगीतकार जोडी नदीम-श्रवण यांनी संगीत दिलं होतं. कुमार सानू यांचा मधुर आवाज आणि आशा भोसले यांचा अनुभव यांचा सुंदर मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतो. 90 च्या दशकातील रोमँटिक संगीताची आठवण करून देणारं हे गाणं तीन दशकांनंतरही लोकप्रिय आहे.

‘जान तेरे नाम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन दीपक बलराज विज यांनी केलं होतं. या चित्रपटात रॉनित रॉय आणि फरहीन मुख्य भूमिकेत होते. विशेष म्हणजे, या दोघांचाही हा पहिलाच चित्रपट होता.

चित्रपटाची कथा कॉलेजमधील प्रेम, तरुणाईच्या भावना आणि लपूनछपून होणाऱ्या भेटींवर आधारित होती. त्यामुळे चित्रपटातील गाण्यांना तरुण प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. चित्रपटाला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी त्यातील गाणी मात्र प्रचंड लोकप्रिय झाली.

गाण्याचे बोल आजही आठवणींना देतात उजाळा

‘हम लाख छुपाएं प्यार मगर दुनिया को पता चल जाएगा’ या ओळींपासून सुरू होणारं हे गाणं प्रेमातील भावना अतिशय सुंदरपणे मांडतं. त्यातील रोमँटिक शब्द, संगीत आणि गायकांचा आवाज यामुळे हे गाणं आजही खास वाटतं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us