अखेर दलजीत कौर हिच्याकडून ‘तो’ खुलासा, अभिनेत्री दुसऱ्यांदा घटस्फोट..?

टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. दलजीत कौरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. दलजीत कौरचा चाहतावर्ग मोठा आहे. दलजीत कौरने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत.

अखेर दलजीत कौर हिच्याकडून तो खुलासा, अभिनेत्री दुसऱ्यांदा घटस्फोट..?
Daljit Kaur
| Updated on: May 25, 2024 | 7:58 PM

अभिनेत्री दलजीत कौर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. दलजीत कौर हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. दलजीत कौरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील बघायला मिळते. दलजीत कौर ही सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते. दलजीत कौर ही तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच बिझनेसमॅन निखिल पटेल याच्यासोबत दलजीत कौरचे लग्न झाले. हेच नाही तर निखिल पटेलसोबतच्या लग्नानंतर दलजीत कौर ही विदेशात शिफ्ट झाली.

दलजीत कौरुने अगोदर स्पष्ट सांगितले होते की, लग्न झाल्यावर ती तिच्या मुलासोबत विदेशात नव्या कुटुंबासोबत स्थायिक होईल. हेच नाही तर काही दिवस ती विदेशात गेली. मात्र, अचानक मुलासोबत दलजीत कौर ही भारतामध्ये परतली. हेच नाही तर पतीसोबतचे सर्व फोटो आणि व्हिडीओ देखील तिने सोशल मीडियावरून डिलीट केले.

दलजीत कौर हिने पतीच्या आडनाव देखील काढले. तेंव्हापासूनच दलजीत कौर हिच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. त्यामध्ये आता तिने सोशल मीडियावर असे काही शेअर केले की, घटस्फोटाच्या चर्चा अजूनच जोर धरून लागल्या आहेत. दलजीत कौर हिने सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट पाहून लोकांना मोठा धक्का देखील बसलाय.

दलजीत काैरने चाहत्यांना प्रश्न विचारलाय की, विवाहबाह्य संबंधात कोणाचा दोष असतो. त्यामध्ये तीन पर्याय दिले आहेत. एक म्हणजे पती, मुलगी आणि पत्नी. यावरून अशी चर्चा आहे की, निखिल पटेल याचे विविहबाह्य संबंध असल्यानेच दलजीत कौर ही त्याला सोडून आलीये. अनेकांनी दलजीत कौरला निखिल पटेलने धोका दिल्याचे सांगितले जातंय.

भारतामध्ये आल्यानंतर आता इतक्या दिवसांनी यावर बोलताना दलजीत कौर ही दिसली आहे. भारतात दाखल झाल्यावरच दलजीत कौरने स्पष्ट केले की, मी आता कामावर लक्ष देणार आहे. हेच नाही तर अभिनेत्री कामाच्या शोधात देखील होती. दलजीत कौर हिचे पहिले लग्न शालीन भनोट याच्यासोबत झाले. या दोघांचा एक मुलगा देखील आहे. जो आता दलजीत कौर हिच्यासोबत राहतो.