AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात लेकीचं गोड स्वागत; शशांक केतकरला कन्यारत्न, नावही ठेवलंय अगदीच खास

प्रसिद्ध मराठी अभिनेता शशांक केतकर आणि त्यांची पत्नी प्रियांका यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. शशांकने सोशल मीडियावर या आनंदाच्या बातमीची घोषणा एका व्हिडीओद्वारे केली असून, त्याच्या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एवढच नाही तर शशांकने त्याच्या लाडक्या लेकीच नावही फार खास ठेवलं आहे.

घरात लेकीचं गोड स्वागत; शशांक केतकरला कन्यारत्न, नावही ठेवलंय अगदीच खास
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jan 23, 2025 | 7:11 PM
Share

मराठी, बॉलिवूड आणि अगदी टॉलिवूडमध्येही गेल्या काही महिन्यांपासून लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. तेसच अनेकांच्या बाळाच्या आगमनाची गोड बातम्याही समोर येत आहेत. अशीच एक गोड बातमी एका मराठी अभिनेत्यानेही दिली आहे. हा लाडका अभिनेता म्हणजे शशांक केतकर.

शशांक केतकरला कन्यारत्न

अभिनेता शशांक केतकरने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी त्याने सर्वांना लवकरच बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान शशांकने आता एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दुसरी आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे शशांकला कन्यारत्न प्राप्त झालं आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत मुलगी झाल्याची गोड बातमी

काही दिवसापूर्वी शंशाकने सोशल मीडियावर पोस्ट करत बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली होती. शशांक आणि पत्नी प्रियांका यांनी खास मॅटर्निटी फोटोशूट करत आई-बाबा होणार असल्याचा आनंद त्यांनी सगळ्यांसोबत शेअर केला होता.

दरम्यान आता शशांक केतकरला एक गोड मुलगी झाली आहे. त्याने व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की, ‘आता खऱ्या अर्थानं कुटुंब पूर्ण झालं. घरात लक्ष्मी आली.’ एवढंच नाही तर शशांकने लेकीचं बारसंही केलं असून नावही ठेवलं आहे.

लेकीच नावही ठेवलं आहे फारच खास

शशांकने त्याच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ही गोड बातमी दिली आहे. याच व्हिडिओतून त्याने लेकीचं नावही जाहीर केलं आहे. शशांकने त्याच्या लाडक्या लेकीचं नाव राधा असं ठेवलं आहे. त्याच्या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच

शशांकने हा व्हिडीओ शेअर करत “खऱ्या अर्थाने आता कुटुंब पूर्ण झालं. घरी लक्ष्मी आली”, म्हटलं आहे. शशांकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक स्टोरीही शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने एक फोटो टाकला आहे. या फोटोला त्याने “हम दो हमारे दो” असं कॅप्शनही दिलं आहे.

शशांकच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कौतूकाचा वर्षाव 

शशांक केतकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. होणार सून मी ह्या घरची मालिकेतून शशांकला प्रसिद्धी मिळाली. त्याने अनेक मालिका, सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. शशांकने 2017 साली प्रियांका ढवळेसोबत लग्न करत संसार थाटला. त्यांना ऋग्वेद हा मुलगा आहे. आता मुलगी झाल्याने शशांक आणि प्रियांका आनंदी आहेत.

दरम्यान शंशाकच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कौतूकाचा वर्षाव होताना पहायला मिळत आहे. अनेक मराठी कलाकरांनी त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी