दीपिका पादुकोण ‘या’ दिवशी होणार आई, मोठा खुलासा, सप्टेंबरच्या…

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. दीपिका पादुकोण ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका पादुकोणची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. दीपिका पादुकोणचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

दीपिका पादुकोण या दिवशी होणार आई, मोठा खुलासा, सप्टेंबरच्या...
Deepika Padukone
| Updated on: Aug 31, 2024 | 2:52 PM

अभिनेत्री दीपिका पादुकोण हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. दीपिका पादुकोणची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे फायटर या चित्रपटात धमाका करताना दीपिका दिसली. दीपिका पादुकोण हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसले. दीपिका पादुकोण आज बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, त्यांच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीरच्या लग्नाला आता सहा वर्ष पूर्ण झाली आहेत.

मध्यंतरी एक चर्चा रंगताना दिसली की, दीपिका पादुकोण ही भारतात नव्हे तर लंडनमध्ये बाळाला जन्म देणार आहे. मात्र, आता हे स्पष्ट करण्यात आले की, मुंबईमध्येच आपल्या पहिल्या बाळाला जन्म दीपिका देणार आहे. सप्टेंबर महिन्यात दीपिकाची डिलीवरी होणार असल्याचे अगोदरच जाहीर करण्यात आले. आता तिची डिलीवरी डेट देखील पुढे आलीये.

रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोण ही सर्वकाही ठीक राहिले तर 28 सप्टेंबरला बाळाला जन्म देईल. दीपिका पादुकोण ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. हेच नाही तर बाळाच्या जन्मानंतर अत्यंत आलिशान घरात दीपिका आणि रणवीर सिंह हे शिफ्ट होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच दीपिका ही मुंबईमध्ये एका हॉटेलबाहेर स्पॉट झाली.

यावेळी दीपिका पादुकोण हिचा बेबी बंप स्पष्ट दिसताना दिसला. जबरदस्त लूकमध्येही दीपिका दिसली. दीपिका ही तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना देखील दिसली. यावेळी प्रभास आणि अमिताभ बच्चन हे दीपिकाची काळजी घेताना दिसले. ज्याचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

दीपिका पादुकोण ही रणवीर सिंह याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर रणबीर कपूर याला डेट करत होती. या दोघांचे लग्न होणार असे सातत्याने सांगितले जात. मात्र, यांचे लग्न होऊ शकले नाही. दीपिका हिच्यानंतर रणबीर हा कतरिना कैफ हिला डेट करताना दिसला. दीपिकाने काही वर्ष रणवीर सिंह याला डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.