तैमूरच्या शाळेच्या कार्यक्रमात करीना खात होती समोसे; करण जोहरने पोस्ट केला व्हिडीओ

करीना कपूर खान तैमूरच्या शाळेतील कार्यक्रमात समोसे खाताना दिसली, ज्याचा व्हिडिओ करण जोहरने शेअर केला. करीना तिच्या आवडत्या पदार्थांबद्दल नेहमीच बोलत असते आणि फिटनेससोबतच ती खाण्याचाही आनंद घेते. करण जोहरने तिला 'कार्बी डॉल' म्हटले, त्यावर करीनाने देखील मजेशीर उत्तर दिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

तैमूरच्या शाळेच्या कार्यक्रमात करीना खात होती समोसे; करण जोहरने पोस्ट केला व्हिडीओ
A video of Kareena Kapoor eating a samosa at Taimur school event has gone viral
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 19, 2025 | 2:21 PM

बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील तेवढीच चर्चेत असते. विशेषत: तिच्या आवडत्या पदार्थांबद्दल ती कायमच बोलताना दिसते. करीना खूपच फुडी आहे. त्याबद्दल ती नेहमीच बोलताना दिसते. जेव्हा जेव्हा तिला संधी मिळते तेव्हा तिला तिचे आवडते पदार्थ खाणे आवडते. व्यायाम करून आपलं फिटनेस जपणारी करीना पार्टीत किंवा कोणत्याही कार्यक्रमात जेवणाचा आनंद घेताना नक्कीच दिसते. अनेकदा तिच्या गर्ल गँगसोबत पार्टी करतानाचे तिचे व्हिडिओ व्हायरल होतात. आताही करिनाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तैमूरच्या शाळेच्या एका कार्यक्रमातील हा व्हिडीओ असून या व्हिडीओमध्ये करीना समोसे खाण्याचा आनंद घेताना दिसत आहे.

मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे वार्षिक कार्यक्रम

गुरुवारी 18 डिसेंबर रोजी मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा वार्षिक कार्यक्रम पार पडला. अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. करीना कपूरचे मुले तैमूर आणि जेह, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात. तसेच करण जोहरची मुले, यश आणि रूही देखील याच शाळेत शिकतात. करीना कपूर आणि करण जोहर यांनी देखील मुलांच्या शाळेतील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर केला आहे

करीनाचा समोसा खाल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल

या कार्यक्रमात करीना कपूर खान समोसे खाण्याचा मनसोक्त आनंद घेत असल्याचे दिसून येते. करण जोहरने तिचा समोसा खातानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. करीना समोसा खात असतानाचा व्हिडीओ करण जोहरने काढला आहे तसेच हा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.तसेच त्याने करीनाला ‘कार्बी डॉल’ असेही म्हटले आहे. करण जोहर पुढे कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ‘ज्यांना वाटते की करीना डाएटवर आहे त्यांनी एकदा बघावे. मला तुझा अभिमान आहे, बेबो. तू माझी कार्बी डॉल आहेस. असेच चांगले खात राहा.’ यावर करीनाने देखील मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. यावर करीना म्हणाली, ‘नाही, मी डाएटवर नाहीये.’


करण जोहरचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट

करीना कपूरचा समोसा खातानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. करिनाने करण जोहरचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. करण जोहर देखील विविध प्रकारचे पदार्थ खाताना दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना करिनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “करणही जेवत आहे. “धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान आणि गौरी खान देखील दिसले. शाहीद कपूर, फराह खान आणि विद्या बालन देखील शाळेच्या कार्यक्रमात उपस्थित होते.