कॉकटेलमध्ये जिवंत मासा; संजय दत्तच्या हॉटेलमधील Video Viral

सध्या सोशल मीडियावर संजय दत्तच्या रेस्टॉरंटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या रेस्टॉरंटमध्ये मिळणारे एक कॉकटेल सध्या चर्चेत आहे.

कॉकटेलमध्ये जिवंत मासा; संजय दत्तच्या हॉटेलमधील Video Viral
Sanjay Dutt
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 04, 2026 | 10:48 AM

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा कायमच चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटामुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. गेल्या काही दिवसांपासून तो ‘धुरंधर २’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे चर्चेत होता. पण सध्या संजय दत्त त्याच्या हॉटेलमुळे चर्चेत आहे. त्याच्या नव्या रेस्टॉरंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला आहे. व्हिडीओ पाहून अनेकानी संजय दत्तला ट्रोल केले आहे.

काही दिवसांपूर्वी संजय दत्तने आपल्या मित्रासोबत ‘अल्ता स्टेला’ नावाचे रेस्टॉरंट आणि बार मुंबईत सुरु केले आहे. या रेस्टॉरंटमध्ये सर्व्ह केल्या जाणाऱ्या एका खास कॉकटेलमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

वाद का?

संजय दत्तच्या ‘अल्ता स्टेला’ रेस्टॉरंटमध्ये ‘एबीसु कॉकटेल’ नावाचे एक ड्रिंक सर्व्ह केले जात होते, ज्यात जिवंत मासा ठेवला होता आणि त्यावर आग लावली जात होती. संजय दत्तने स्वतः या कॉकटेलची जाहिरात सोशल मीडियावर केली होती. मात्र, या जाहिरातीला आणि कॉकटेलला अॅनिमल वेल्फेअर कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला. सोशल मीडियावर या कॉकटेलचे प्रचंड ट्रोलिंग झाले. अखेर वाढत्या वादामुळे संजय दत्तला आपल्या रेस्टॉरंटच्या मेन्यूमधून हे ‘फिश कॉकटेल’ काढून टाकावे लागले.

रेस्टॉरंटने दिले स्पष्टीकरण

वाद वाढल्यानंतर रेस्टॉरंटने सोशल मीडियावर एक पोस्ट करून सांगितले की, हे कॉकटेल मीन राशीपासून प्रेरित आहे. द्वैत, प्रवाहीपणा आणि सह-अस्तित्व यांचे प्रतीक म्हणून हे ड्रिंक ठेवण्यात आले होते. या कॉकटेलसाठी वापरलेला मासा बेट्टा फिश (Siamese Fighting Fish) आहे. हा मासा एकटे राहणारा आणि पाण्याच्या पृष्ठभागावरून श्वास घेऊ शकणारा असतो.
रेस्टॉरंटने स्पष्ट केले की, मासा हा ड्रिंकमध्ये मिसळलेला नसतो. तो फक्त दृश्य सजावटीसाठी (visual presentation) वेगळ्या काचेच्या चेंबरमध्ये ठेवला जातो. म्हणजे पिणारा फक्त कॉकटेल पितो, मासा खात नाही.

विशेष म्हणजे जगभरातील अनेक हाय-प्रोफाइल बार्स (टोकियो, लंडन, न्यूयॉर्क) मध्ये हे कॉकटेल आधीपासूनच सर्व्ह केले जाते. तरीही भारतात प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या लोकांनी याला तीव्र विरोध दर्शवला.

Follow Us