AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेकीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर आमिर खानने किरण रावला केलं किस; व्हिडीओ व्हायरल

2021 मध्ये आयराने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली. सप्टेंबर 2021 मध्ये नुपूरने आयराला लग्नासाठी प्रपोज केलं. त्याच्या दोन महिन्यांनंतर दोघांनी साखरपुडा जाहीर केला. नैराश्य आणि मानसिक स्वास्थ्याशी संबंधित समस्यांचा सामना करताना नुपूरने खूप साथ दिल्याचं आयराने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं.

लेकीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर आमिर खानने किरण रावला केलं किस; व्हिडीओ व्हायरल
Aamir Khan and Kiran RaoImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 04, 2024 | 8:42 AM
Share

मुंबई : 4 जानेवारी 2024 | बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान नुकतीच लग्नबंधनात अडकली. बुधवारी 3 जानेवारी रोजी मुंबईतील ताज लँड्स एँड या पंचतारांकित हॉटेलमध्ये हे लग्न नोंदणी पद्धतीने पार पडलं. यावेळी आमिर खानच्या दोन्ही पूर्वी पत्नी उपस्थित होत्या. आयरा ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आहे. पहिल्या पत्नीपासून आमिरला जुनैद हा मुलगासुद्धा आहे. तोसुद्धा बहिणीच्या अत्यंत खास दिवशी त्याठिकाणी उपस्थित होता. याशिवाय आमिरची दुसरी पत्नी मुलगा आझादला घेऊन लग्नाला पोहोचली होती. या लग्नाचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र एका व्हिडीओ नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये स्टेजवर आमिर पहिल्या पूर्व पत्नीसमोरच किरण रावला गालावर किस करताना दिसून येत आहे.

आमिर खानने किरण रावला केलं किस

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आमिर आणि जावई नुपूरचे कुटुंबीय फोटोसाठी एकत्र स्टेजवर उभे असल्याचं पहायला मिळत आहे. स्टेजच्या एका बाजूला किरण तिच्या मुलासोबत उभी असते. तेव्हा आमिर तिच्याजवळ जातो आणि गप्पा मारू लागतो. त्याचवेळी आमिर किरणच्या गालावर किस करतो आणि ती हसते. ग्रुप फोटोपासून किरण दूर जात असते, पण नंतर आमिर तिला स्टेजवर थांबायला सांगतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

‘हिंमत लागते भावा. एका पूर्व पत्नीसमोर दुसऱ्या पत्नीला किस करणं.. हॅट्स ऑफ आमिर भाई’, असं एकाने लिहिलं. तर ‘यांचं ठीक आहे. घटस्फोट घेऊनसुद्धा सगळं नॉर्मल आहे. इथे तर जरा भांडण झालं तरी एकमेकांचा चेहरा बघत नाहीत’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. आमिर खान किरणला किस करताना स्टेजवर दुसऱ्या बाजूला त्याची पहिली पत्नी रिनासुद्धा तिथेच उभी होती.

आमिर आणि रिना दत्ता यांची मुलगी आयरा खानने फिटनेस कोच नुपूर शिखरेशी लग्न केलं. हा लग्नसोहळा विविध कारणांमुळे चर्चेत आला आहे. या लग्नात वर नेहमीप्रमाणे वरात घेऊन घोड्यावर किंवा नाचत-गाजत आला नाही. तर तो चक्क जॉगिंग करत विवाहस्थळी पोहोचला होता. बनियान आणि शॉर्ट पँट याच लूकमध्ये त्याने नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर फोटो क्लिक करण्यासाठी त्याने सूट परिधान केला होता. तर आयरा खानने डीप कट चोली, आणि त्याखाली धोती पँट्स परिधान केला होता. यावर तिने दुपट्टा घेतला होता. लग्नातील आयराचा हा वेगळा लूकसुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर सर्व कुटुंबीय फोटोसाठी पापाराझींसमोर आले. नुपूर त्याच्या घरापासून विवाहस्थळापर्यंत धावत गेला होता. त्याच्या जॉगिंगचाही व्हिडीओ व्हायरल होत आहे. नोंदणी पद्धतीने लग्नानंतर येत्या 8 जानेवारी रोजी नुपूर आणि शिखरे यांनी उदयपूरमध्ये रिसेप्शनचं आयोजन केलं आहे.

आमिर खानचा जावई नुपूर शिखरे हा सेलिब्रिटी फिटनेस कोच आणि कन्सल्टंट आहे. बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी नुपूरचे क्लाएंट आहेत. यात आमिर खान आणि सुष्मिता सेन यांचाही समावेश आहे. 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान आयरा तिच्या वडिलांसोबत राहत होती. त्यावेळी तिची पहिल्यांदा ओळख नुपूरशी झाली. सुरुवातीला ही ओळख आयराच्या फिटनेससाठीच झाली होती. हळहळू या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.