Abhishek Bachchan : आराध्याने बाबांची प्लेलिस्टच बदलली ! अभिषेक बच्चन म्हणतो, ‘आता टेलर स्विफ्टही ऐकतो…’
अभिषेक बच्चनची संगीत आवड आता लेक आराध्यामुळे बदलली आहे. किशोर कुमार आणि आर.डी. बर्मनच्या गाण्यांचा चाहता असलेले अभिषेक आता आराध्यामुळे टेलर स्विफ्ट, एरियाना ग्रांडी ऐकतोय. एक खास किस्साही त्याने सांगितला..

अभिनेता अभिषेक बच्चन (Abhisheck Bachchan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai), बॉलिवूडमधल्या याकपलप्रमाणेच, त्यांची मुलगी आराध्या देखील बरीच चर्चेत असते. नुकतेच हे दोघे, आराध्यासोबत् फेमस पॉप गायिका अरियाना ग्रँडी हिची कॉन्सर्ट पहायला गेले होते. मात्र तिथे गेल्यावर, त्यांना तिचं एकंही गाणं माहीत नव्हतं, तरीही तिच्या गाण्यामुळे ते प्रभावित झाले, त्यांना तिचं गाणं आवडलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चनवा, त्याच्या आवडत्या म्युझिशिअनबद्दल विचारण्यात आलं. त्याच्या लिस्टमध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय संगीतकार आणि गायकांची नावं होती. मात्र आपल्या लेकीमुळे आता अनेक लोकप्रिय, विख्यात आंतरराष्ट्रीय कलाकारांचं संगीतही मी ऐकत असतो, असं त्याने नमूद केलं.
आराध्याच्या म्युझिक टेस्टबद्दल अभिषेक म्हणाला..
बीबीसी एशिअन नेटवर्कशी संवाद साधताना अभिषेकने त्याच्या आवडत्या कलाकारांची नावं सांगितली. ‘ किशोर कुमार माझे खास आवडते आहेत. मला हिंदी चित्रपटांचं संगीत आवडतं, विशेषत: जुनी गाणी. आरडी बर्मन, एसडी बर्मन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पी लहरी, ते सगळेच शानदार आहेत. मला ते खूप आवडतात’ असं त्याने नमूद केलं. पुढे आपली टीनएज लेक आराध्याचा उल्लेख करत तो म्हणाला, तिच्यामुळे मी टेलर स्विफ्ट सारख्या गायकांचंही गाणं ऐकू लागलोय.
त्याने आराध्याच्या संगीताच्या ‘इक्लेक्टिक’ आवडीबद्दलही सांगितलं. अभिषेक म्हणाला, “ घरी माझी 14 वर्षांची मुलगी आहे, त्यामुळे ओलिव्हिया रोड्रिगो, टेलर स्विफ्ट आणि एरियाना ग्रांडी यांची बरीच गाणी ऐकायला मिळतात. पण सुदैवाने तिला 80च्या दशकातील संगीतही आवडतं. ती आता बॉन जोवी, व्हॅन हेलेन आणि मेटालिका यांचं संगीतही ऐकू लागली आहे, त्यामुळे ते मजेशीर आहे. तिची संगीताची समज चांगली आहे, त्यामुळे मी सुरक्षित आहे. मला फक्त हीच गाणी ऐकत बसावे लागत नाही…” असं तो मजेत म्हणाला.
लेकीसह कॉन्सर्टचा किस्सा
अभिषेकने पुढे एरियाना ग्रांडीच्या कॉन्सर्टबद्दलही सांगितलं. “ उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही परदेशात होतो. ती (आराध्या) आम्हाला एरियाना ग्रांडीचा कॉन्सर्ट दाखवण्यासाठी घेऊन गेली. पण मला तिचं एकही गाणं माहीत नव्हतं, पण ती महिला अप्रतिम गाऊ शकते. ओह माय गॉड! आवाजाची गुणवत्ता… अविश्वसनीय! आणि या तरुण गायकांची जी फॅन फॉलोइंग आहे, ते पाहणंही अविश्वसनीय आहे. मला वाटतं की ते सर्वजण खूपच प्रतिभावान आहेत. आणि मला माहीत आहे की आपण जुन्या पिढीतील लोक असं म्हणत असतो की अरे नाही, आम्हाला टेलर स्विफ्टचं गाणं नाही ऐकायचं. पण नाही, ते खरोखरच खूप चांगले संगीत तयार करतात.” असं त्याने सांगितलं.
अभिषेक बच्चनच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तो नुकताच रितेश देशमुख च्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटात दिसला होता. तर लवकरच तो शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ चित्रपटातही दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद याचं दिग्दर्शन करत असून त्यात शाहरूख लीड रोलमध्ये आहे. त्याच्यासह त्याची लेक सुहाना खान, दीपिका पादुकोण, राणी मुखर्जी, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, अर्शद वारसी सह इतरही कलाकार झळकणार आहे. 24 डिसेंबरला हा पिक्चर मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.