
स्वामी समर्थांची कृपा जिथे असते… तिथे संकटेही दूर पळतात… स्वामींच्या लीला म्हणजे त्यांच्या चमत्कारांच्या कथा आणि भक्तांवर त्यांची कृपा दर्शवणारे अनुभव… कोणतंही संकट आलं ही समोर येतो तो म्हणजे स्वामींच्या चेहरा… ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे…’ हे वाक्य मनाला समाधान देणारं आहे. स्वामी कोण आहेत हे ओळखणं कठीण, पण मायेची उब देणारं एकमेव ठिकाण म्हणजे स्वामींचे चरण… स्वामींच्या लीलांवर आधारित अनेक मालिका आणि सिनेमे देखील चाहत्यांच्या भेटीस आले. अशाच सिनेमांमधील एक म्हणजे, ‘देऊळ बंद’ सिनेमा.., ‘देऊळ बंद’ सिनेमात स्वामींनी राघव शास्त्रीला संटकातून मुक्त केलं. ‘नीट बघ संकट मुक्त होशील…’ हे वाक्य आजही चर्चेत असतं.
सिनेमात राघव शास्त्रीची भूमिका अभिनेता गश्मिर महाजनी याने साकारली. सिनेमात राघव शास्त्रीच्या प्रोजेक्टचा पासवर्ड चेंज करून त्याचं आयुष्याला चकवा देणारी त्याची मुलगी आठवतेय का? ती मुलगी आता मोठी झाली आहे आणि तिला ओळखणं देखील कठीण झालं आहे.
2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद’ या गाजलेल्या सिनेमात अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर अभिनेत्याच्या मुलीचं नाव सना असं होतं. लहान वयात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांनी चकित केलं. तिचं नाव आर्या घारे असं आहे.
आर्या हिला ओळखणं देखील आता कठीण झालं आहे. आर्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आर्या वेगवेगळ्या ब्रँड्ससाठी रील्स बनवते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आर्या कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
इन्स्टाग्रामवर आर्य हिला फॉलो करणाऱ्यांची संख्या 83.7K इतकी आहे. तर आर्या फक्त 196 नेटकऱ्यांना फॉलो करते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.