प्रार्थना बेहरेनं केलं नव्या पाहुण्यातं स्वागत, चिमुकल्यासोबत फोटो पोस्ट करत म्हणाली, ‘माझं बाळ…’
Prarthana Behere: 'माझं बाळ...', प्रार्थना बेहरेने चाहत्यांसोबत शेअर केली 'गुडन्यूज', चिमुकल्यासोबत खास फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना... सध्या चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त प्रार्थनाच्या पोस्टची चर्चा...

Prarthana Behere: अभिनेत्री प्रार्थना हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. र्थना बेहरे हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका आणि ‘मितवा’ सिनेमामुळे प्रार्थनाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. आता देखील सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांसोबत ‘गुडन्यूज’ शेअर केली आहे. सोशल मीडियावर प्रार्थनाच्या पोस्टची तुफान चर्चा सुरु आहे.
सांगायचं झालं तर प्रार्थना आणि तिच्या पतीला प्राण्यांची प्रचंड आवड आहे. आता देखील प्रर्थानाने नव्या चिमुकल्या श्वानाचा क्यूट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘माझं आणि आणखी एक बाळ… ‘रील’ला भेटा… आपली गरज कोणाला अधिक आहे हे कुत्र्यांना बरोबर कळतं. ते आपल्या आयुष्यातील अशी पोकळी भरुन काढतात, जी आपण कधी अनुभवली देखील नसेल…’
पतीचे आभार मानत प्रार्थना म्हणाली, ‘अभिषेक, रीलला चांगलं घर आणि उत्तम आयुष्य दिल्याबद्दल तुझे आभार मानते. मी तुला कधीच निराश करणार नाही..असं वचन देखील देते..’, प्रार्थनाच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
View this post on Instagram
प्रार्थना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, लग्नानंतर कधीच स्वतःचं मूल न होऊ देण्याचा निर्णय अभिनेत्री आणि पती अभिषेक जावकर यांनी घेतला आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने यावर मौन देखील सोडलं होतं. ‘आमच्या घरी सात डॉग्ज आहेत. फार्महाऊसवर पण अनेक श्वान आहेत. तसंच फार्महाऊसवर गायी आणि घोडे देखील आहे. 10 – 12 घोडे आहेत. हिच आमची मुलं. आम्हाला मणुष्याची मुलं नकोत… त्यामुळे मी आणि माझ्या नवऱ्यानं ठरवलं आहे की, हिच आपली आपली मुलं आहेत.’
प्रर्थना बेहरे हिच्या पतीचं नाव अभिषेक जावकरशी असं आहे. 14 नोव्हेंबर 2017 मध्ये प्रार्थना आणि अभिषेक यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
