कॅसेट किंग गुलशन कुमार यांची हत्या करणाऱ्या अब्दुल मर्चेंटचं निधन, मृत्यूचं धक्कादायक करण समोर

कॅसेट किंग गुलशन कुमार यांच्यावर16 राउंड फायर करुन ठार मारणाऱ्या अब्दुल मर्चेंट याचं निधन..., तुरुंगात असं काय झालं, ज्यामुळे गुन्हेगाराला तात्काळ रुग्णालयत दाखल करावं लागलं... मृत्यूचं धक्कादायक कारण अखेर समोर

कॅसेट किंग गुलशन कुमार यांची हत्या करणाऱ्या अब्दुल मर्चेंटचं निधन, मृत्यूचं धक्कादायक करण समोर
गुलशन कुमार
| Updated on: Jan 10, 2026 | 8:21 AM

प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक गुलशन कुमार यांची ओळख कॅसेट किंग अशी देखील होती. त्यांनी गायीलेली गाणी आणि भजणं आजही रसिकांच्या पसंतीस उतरतात. पण 28 वर्षांपूर्वी एका काळा दिवस आला आणि कॅसेट किंगची हत्या करण्यात आली. गुलशन कुमार यांच्या हत्येच्या आरोपांखाली शिक्षा भोगत असलेल्या अब्दुल रऊफ मर्चेंट याचं निधन झालं आहे. वयाच्या 60 व्या त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अब्दुल रऊफ मर्चेंट याची प्रकृती खालावलेली होती. नुकताच त्याला हृदय विकाराचा झटका देखील आहे. ज्यामुळे अब्दुल रऊफ मर्चेंट याला तात्काळ रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

रिपोर्टनुसार, 30 डिसेंबर 2025 मध्ये अब्दुल रऊफ मर्चेंट याला हृदय विकाराचा झटका आला. ज्यानंतर त्याला शहरातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आली. प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्याला 4 जानेवारी 2026 रोजी रुग्णालायातून सोडलं. पण गुरुवारी सकाळी त्याला पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं निधन झालं. अखेर अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कशी झालेली गुलशन कुमार यांची हत्या?

12 ऑगस्ट 1997 मध्ये साऊध अंधेरी येथील जीतेश्वर महादेव मंदिराबाहेर दिवसा गुलशन कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बॉडीगार्डशिवाय पूजेसाठी आलेल्या गुलशनवर तीन हल्लेखोरांनी 16 राऊड फायरिंग केली. अब्दुल हा तीन हल्लेखोरांपैकी एक होता. या घटनेत त्यांच्या ड्रायव्हरलाही गोळी लागली. गुलशन यांचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

काय होता वाद?

गुलशन कुमार यांच्या हत्येला केवळ व्यावसायिक वाद मानले गेलं नाही, तर अंडरवर्ल्डकडून दहशत आणि नियंत्रण स्थापित करण्याचा कट म्हणून पाहिले गेलं. 90 च्या दशकात बॉलिवूड आणि म्यूजिक इंडस्ट्रीवर अंडरवर्ल्डची दहशत होती. रिपोर्टनुसार, टी – सीरिजचे मालक गुलशन कुमार यांच्याकडून खंडनी मागणी होती. पण त्यांनी त्यास नकार दिला. याच कारणामुळे गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली. यामध्ये अब्दुल याला पोलिसांनी अटक केली.

अब्दुल याला नंतर 2009 मध्ये पॅरोलवर सोडण्यात आलं, परंतु तुरुंगातून बाहेर येताच तो फरार झाल्याची देखील माहिती समोर आली. जवळजवळ आठ वर्षे पोलिस कोठडीबाहेर राहिल्यानंतर, 2016-17 दरम्यान त्याला पुन्हा अटक करण्यात आली आणि हर्सूल तुरुंगात परत पाठवण्यात आलं.