Abhijeet Bhattacharya : मी कधीच धोका देणार नाही; दलेर मेहंदी लिप-सिकिंग वादानंतर गायक अभिजीत भट्टाचार्य यांचं मोठं वक्तव्य
दलेर मेहंदी यांच्या लाईव्ह कार्यक्रमातील लिपसिंकिंगच्या आरोपांवरून वाद सुरू असतानाच प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘आपण प्रेक्षकांची फसवणूक करणार नाही,’ असं सांगत त्यांनी लाइव्ह गाण्याबाबत ठाम भूमिका मांडली. छत्तीसगडमधील कार्यक्रमात त्यांनी नेमकं काय म्हटलं?

गेल्या काही दिवसांपासून दलेर मेहंदी कॉन्सर्टमधील लिप सिंकिंगवरुन एकच गदारोळ उठला आहे. या प्रकरणावर अनेकांनी त्यांची मतं मांडली. प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांच्या भावाने म्हणजे मिका सिंगने ते आजारी असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने असे वागले असल्याचं मत मांडलं. पण आता बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक यांनी या मुद्द्यावर मांडलेलं मत चर्चेत आलं आहे. त्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
जर कोणी लाईव्हच्या नावावर कार्यक्रम घेत असेल आणि उपस्थित राहूनही गाणं गात नसेल तर सहन करु नका, अशा प्रकारांना अजिबात थारा देऊ नका. गेल्या काही दिवसांमध्ये असे प्रकार घडताना मी पाहतो आहे. आताच एक प्रकार झाला. त्यामध्ये मंत्री जे बोलले, ते योग्य होतं पण त्यांनी मंचावरुन जाब विचारला आणि ते सर्वांच्या नजरेमध्ये व्हिलन ठरले असे स्पष्ट मत लोकप्रिय गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी मांडलं आहे. ते एका लाईव्ह कार्यक्रमामध्ये बोलत होते. मी प्रामणिक आहे आणि मी गाण्याच्या नावावरती फक्त ओठ हलवायचं काम कधीही करणार नाही, असंही ते रोखठोकपणे म्हणाले आहेत.
नेमंक काय म्हणाले अभिजित?
तुम्ही कधीच असं अलाऊड करु नका, की कोणी लाईव्हच्या नावावर येतं आणि गाणंच म्हणत नसेल तर अलाऊड करुच नका. आता काहीच दिवसांपूर्वी एक केस झाली होती. जिथे स्टेजवर जाऊ मंत्री महोदयांनी म्हटलं, त्यांनी जे म्हटलं ते अगदी खरं होतं, ते म्हणालेले की तुम्ही गाणं गात नाही आहात, तुम्हाला उभा राहणंही शक्य होत नाहीये, तुम्ही गाणं गातच नाहीत, असं अगदी योग्य बोलले होते. पण ते सगळ्यांना चुकीचे वाटू लागले, ते व्हिलन झाले. पण अशा मंचांवर हे होतं राहतं. पण तुम्ही छत्तीसगढमध्ये हे होऊ देऊ नका. मी जसंही गाईन, चुकीचं, बरोबर, माझा आवाज खराब असेल, थकून गेलेला असेल, बेसूर गाईन, पण जेही गाईन ते लाईव्ह गाईन.
त्याचं कारण म्हणजे तुम्ही प्रेक्षक एवढा वेळ देता, पैसे खर्च करता, मला बोलवता, यामागे खूप मेहनत असते, प्रशासनाची मेहनत असते, त्यामुळे मी तुम्हाला नमन करतो आणि वचन देतो की मी तुम्हाला कधीही चीट करणार नाही. गाण्याच्या नावावर ओठ हलवण्याचे प्रकार सुरु आहेत, लोक करतात, असं अभिजीत म्हणाले आहेत. ते छत्तीसगढ राज्य उत्सव 2026 या कार्यमक्रमात बोलत होते.