AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोटाची पोस्ट लाईक केल्यानंतर अभिषेक बच्चनची पहिली पोस्ट; म्हणाला, ‘ऑल द बेस्ट…’

Abhishek Bachchan and Aishwarya Rai: अभिषेक बच्चन याच्या घटस्फोटाची चर्चा, घटस्फोटाची पोस्ट लाईक केल्यानंतर अभिनेता कोणाला म्हणाला, 'ऑल द बेस्ट...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेक याने पोस्ट केलेल्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा...

घटस्फोटाची पोस्ट लाईक केल्यानंतर अभिषेक बच्चनची पहिली पोस्ट; म्हणाला, 'ऑल द बेस्ट...'
| Updated on: Jul 25, 2024 | 12:04 PM
Share

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये अभिषेक – ऐश्वर्या यांनी लग्न केलं. पण गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोग धरला आहे. एवढंच नाही तर, काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन याने घटस्फोटासंबंधी एक पोस्ट लाईक केली होती. त्यामुळे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी आणखी जोर धरला. घटस्फोटाची पोस्ट लाईक केल्यानंतर अभिषेक याने पहिल्यांदा एक पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

घटस्फोटाची चर्चा रंगलेली असताना अभिषेक बच्चन याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अभिषेक बच्चन याने जीओ सिनेमावरील ‘घुडचढी’ सिनेमाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सिनेमाचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने टीमचे आभार मानले आहे.

सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात पार्थ सनथान, खुशाली कुमार, संजय दत्त, आणि रविना टंडन स्टारर सिनेमा वडील आणि मुलगा यांच्या नात्यावर आधाटरलेला आहे. सिनेमाचा ट्रेलर पोस्ट करत अभिषेक म्हणाला, ‘धन्यवाद निधी आणि बिनॉय… तुम्हाच्या नव्या प्रवासासाठी आनंदी आहे… ऑल द बेस्ट…’ असं म्हणत अभिनेत्याने सिनेमातील सर्व कलाकारांना टॅग देखील केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेक बच्चन याच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांचं नातं… 

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. रंगणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांवर ऐश्वर्या – अभिषेक किंवा दोघांच्या कुटुंबियांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. सांगायचं झालं तर, अनंत अंबानी यांच्या लग्नात देखील ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन वेग-वेगळे पोहोचले.

अभिषेक बच्चन पूर्ण कुटुंबासोबत आला, तर ऐश्वर्या लेक आराध्या हिच्यासोबत आली. सोशल मीडियावर बच्चन कुटुंबियांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना