अखेर अभिषेक बच्चनने केला ऐश्वर्या राय आणि त्याच्या भांडणाबद्दल थेट ‘हा’ खुलासा, म्हणाला, नेहमीच..

Abhishek Bachchan and Aishwarya Rai : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. अभिषेक बच्चन याने केला ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. हेच नाही तर अभिषेक बच्चन याने केला ऐश्वर्या राय यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

अखेर अभिषेक बच्चनने केला ऐश्वर्या राय आणि त्याच्या भांडणाबद्दल थेट हा खुलासा, म्हणाला, नेहमीच..
| Updated on: Feb 12, 2024 | 12:33 PM

मुंबई : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहेत. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल सतत विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. हेच नाही तर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे देखील सांगितले गेले. मात्र, यावर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय किंवा बच्चन कुटुंबाकडून काहीही भाष्य करण्यात नाही आले. उलट अभिषेक बच्चन याच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत खास अशी पोस्ट सोशल मीडियावर ऐश्वर्या राय हिने शेअर केली.

काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन हा ऐश्वर्या राय हिच्यासोबत असलेल्या रिलेशनवर भाष्य करताना दिसला. अभिषेक बच्चन हा थेट म्हणाला की, काहीही झाले तरीही माफी ही मलाच मागावी लागते. हेच नाही तर चूक कोणाची आहे आणि कोणत्या गोष्टीवरून आपण वाद करतो हे महत्वाचे नाही.

माझ्यामध्ये आणि ऐश्वर्या रायमध्ये ज्यावेळी वाद होतात, त्यावेळी मीच कायम माफी मागतो. मला वाटते की, हे फक्त मीच नाही तर जवळपास सर्वच पुरूष असे करत असतील एक नियम आहे की, आमचे कितीही भांडणे झाली किंवा वाद झाले तरीही ते वाद मिटवल्याशिवाय झोपायचे नाही.

झोपण्याच्या अगोदरच ते वाद संपवावे हा नियम आहे. अभिषेक बच्चन याने हे स्पष्ट केले की, जेंव्हाही त्याच्यामध्ये आणि ऐश्वर्या रायमध्ये वाद होतो त्यावेळी तोच माफी मागतो. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे दोघेही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसतात. काही दिवसंपूर्वीच विदेशात जाताना हे स्पाॅट झाले.

अभिषेक बच्चन याने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये थेट ऐश्वर्या राय हिच्यासोबत चित्रपटात काम करण्याची इच्छा ही जाहिर केली. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा एका व्हिडीओ व्हायरल होताना दिसला. आराध्या, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे विदेशात सुट्टीसाठी गेले होते. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांमध्ये आनंद बघायला मिळाला.