ऐश्वर्यासोबत घटस्फोटाची चर्चा असताना अभिषेक म्हणाला, “तसंच करा.., चाहते शॉक

Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय हीच्यासोबत घटस्फोटाची चर्चा असताना अभिषेक बच्चनचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अभिषेक या व्हीडिओत लग्नाबाबत सल्ला देतोय.

ऐश्वर्यासोबत घटस्फोटाची चर्चा असताना अभिषेक म्हणाला, तसंच करा.., चाहते शॉक
Aishwarya Rai and Abhishek Bachchan
| Updated on: Dec 02, 2024 | 7:41 PM

बिग बी अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन गेल्या अनेक दिवसांपासून पर्सनल लाईफमुफे फार चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय हे दोघेही विभक्त होणार असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर अभिषेक बच्चन याचं ‘दसवी’ या सिनेमातील अभिनेत्री निम्रत कौरसोबत अफेअर असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप याबाबत दोघांनीही काहीही म्हटलेलं नाही. ऐश्वर्यासोबत घटस्फोट आणि निम्रत कौरसोबर अफेयरची चर्चा असताना अभिषेक बच्चन याचा सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.अभिषेक या व्हीडिओत लग्नाबाबत इतरांना सल्ला देताना दिसतोय.

नुकतंच फिल्मफेयर ओटीटी अवॉर्ड्स 2024 चं आयोजन करण्यात आलं होतं. या अवॉर्ड शोमध्ये अभिषेक बच्चनला प्रश्न विचारण्यात आला. “तुम्ही इतकी चांगली कामगिरी करता की टीकाकारांना कोणतेही प्रश्न उपस्थित करता येत नाहीत. तुम्ही हे कसं करता? यामागचं नक्की रहस्य काय?” असा प्रश्न अभिषेकला विचारण्यात आला. यावर अभिषेक म्हणाला की, “आम्ही तेच करतो जे डायरेक्टर आम्हाला करायला सांगतात. निमुटपणे काम करुन घरी येतो”.

होस्ट त्यानंतर अभिषेकच्या उत्तरावर बोलताना मस्करीत म्हणाला की हे लग्नाबाबतही लागू होतं असेल? यावर अभिषेक हसत उत्तर देताना म्हणाला की, “हा, सर्व विवाहीत पुरुषांना असं करावं लागतं. बायको म्हणते, तेच करा”. अभिषेकचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर आता तुफान व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हीडिओबाबत व्यक्त होत आहेत.

अभिषेकच्या या व्हीडिओनंतर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “बायकोचा विषय आल्यावर तो खरंच अस्वस्थ झाला”, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर दुसऱ्या नेटकऱ्यानेही मोठी प्रतिक्रिया दिली.

अभिषेक बच्चनचा विवाहितांना सल्ला

अभिषेक ऐश्वर्याबाबत बोलायला नकार का देतो? काही वर्षांपूर्वी एका टॉक शोमध्ये एका चाहत्याने प्रश्न केला होता की ऐश्वर्यासोबत बाहेर जातो का? तिचं नाव घ्यायलाही कचरत होता आणि विषय बदलत होता. या कुटुंबात काय समस्या आहे. त्याला असं वाटतं का की अशाप्रकारे बोलल्याने लोकांमध्ये त्याच्याप्रती सहानुभूती वाढेल?, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर एका नेटकऱ्याने तर टोकच गाठलंय. घटस्फोट नक्की होणार आहे, असं म्हटलं.