अजितदादांच्या निधनानंतर अभिनेते किरण मानेंची पोस्ट चर्चेत; काय आहे पोस्टमध्ये?

Ajit Pawar plane crash: महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राज्यात दुःखाचा वातावरण आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दादांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर अभिनेते किरण माने यांनी देखील अपघातानंतर एक पोस्ट केली आहे. सध्या त्यांची पोस्ट चर्चेत आहे.

अजितदादांच्या निधनानंतर अभिनेते किरण मानेंची पोस्ट चर्चेत; काय आहे पोस्टमध्ये?
Ajit Pawar
| Updated on: Jan 30, 2026 | 1:56 PM

राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात… त्यानंतर विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी… अशी बातमी समोर आल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली. पण काही क्षणात राज्याचं राजकारणाला मोठा धक्का बसणारी बातमी समोर आली आणि ती म्हणजे बारामती येथे सभेला जात असताना अजित पवार यांचं विमान अपघातात निधन… या बातमीनंतर संपूर्ण राज्याच शोककळा पसरली… या दुर्दैवी अपघातात, अजित पवारांचे सुरक्षारक्षक, दोन पायलट आणि फ्लाइट अटेंडंट यांचाही समावेश होता. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला.

पण आता आपल्या बेधडक मतांसाठी ओळखले जाणारे अभिनेते किरण माने यांची फेसबूक पोस्ट चर्चेत आली आहे. फेसबूकवर एक पोस्ट करत किरण माने म्हणाले, ‘घातपात’ हा शब्द उच्चारताच ठरावीक नीच विचारधारेतलेच लोक का चिडून अंगावर येतात??? अतिमहत्त्वाची व्यक्ती अपघातात गेल्यानंतर या चर्चा स्वाभाविक असतात. पण आजकाल अशी चर्चा केली की विशिष्ठ विचारधारेच्या वळचणीतल्या आश्रितांना राग का येतो??? आपल्यातच धडावर आपलं डोकं ठेवून विचार करा!’ सध्या त्यांची पोस्ट चर्चेत आहे.

अजित पवार यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर देखील किरण माने यांनी एक पोस्ट केलेली. ‘तिकडे’ जाऊनसुद्धा कधीही धर्म – जातीचं राजकारण न केलेला… कधीही बाजी पलटवण्याची क्षमता असेलला उदाम नेता गेला… आदरणीय गोपीनाथ मुंडेंसारखीच धक्कादायक एक्झिट… अलविदा दादा! असं म्हणत किरण माने यांनी दुःख व्यक्त केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन

बुधवारी सकाळी जवळपास 8.30 वा. सुमारास अजित पवार यांच्या विमान अपघाताची माहिती समोर आली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातून खर-खर आवाज येत होता आणि दोनवेळा विमानाने आकाशात फेरी मारली. यावेळी विमान तिरका झालेला आणि खाली पडल्यानंतर चार ते  पाच स्फोट झाले. आता याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.

मृत्यूनतर गुरूवारी दुपारी बारामतीमध्ये हजारो शोकाकुल नागरिकांच्या उपस्थिथी अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.  यावेळी अनेक राजकराणी, नेते, उपस्थित होते. अजित दादा यांच्या निधनानंतर पवार कुटुंबियांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला असून राज्याच्या राजकारणाचं देखील मोठं नुकसान झालं आहे.