
तुम्ही भाजी खरेदी करायला गेलात आणि अचानक तुम्हाला रस्त्यावर एखादा कलाकार रस्त्यावर भाजी विकताना दिसला तर किती आश्चर्य वाटेल. पण असं खरंच झालं आहे एका प्रसिद्ध अभिनेत्याला चक्क रस्त्यावर कांदे विकताना पाहिलं गेलं. त्याचा फोटोही व्हायरल झाला आहे. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.
अभिनेता म्हणजे सुनील ग्रोव्हर रस्त्यावर कांदे का विकतोय?
मुख्य म्हणजे हा विनोदी अभिनेता कपिल शर्मा शोमध्ये काम केलेला आहे. हा अभिनेता म्हणजे सुनील ग्रोव्हर. होय सुनील ग्रोव्हर रस्त्यावर चक्क कांदे विकताना दिसला. त्याचा फोटो इंटरनेटवर सध्या तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो रस्त्याच्या कडेला कांदे विकत असल्याचे दिसत आहे. त्याचा हा अवतार पाहून चाहत्यांनाही प्रश्न पडलाय की सुनीलवर कांदा विकण्याची वेळ का आली?
एक अनुभव म्हणून….
दरम्यान हा फोटो सुनील ग्रोव्हरने शेअर केला आहे. त्याने कदाचित एक अनुभव म्हणून काही वेळ त्याने कांदे विकून पाहिल्याचं म्हटलं जात आहे. याच्या आधाही तो अनेकदा अगदी सामान्य माणसांप्रमाणे रस्त्यावर झोपताना वैगरे दिसला होता. सुनीलला नेहमी सर्वसामान्यांमध्ये वावरायला आवडतं आणि हे त्याच्या अनेक अॅक्टिव्हिटींमधून दिसतं.
कांद्याने भरलेल्या ट्रकवर बसला असून….
सुनील फोटोमध्ये कांद्याने भरलेल्या ट्रकवर बसला असून दुसऱ्या फोटोत तो कांद्याचे तराजूत वजन करताना दिसत आहे. एका फोटोमध्ये तो कोणाशी तरी बोलत आहे आणि शेवटच्या फोटोमध्ये कांदे विकताना तो एका मुलाला मांडीवर घेऊन बसला आहे. हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘आज कांद्यापासून काहीतरी बनवा.’ चांगला दिवस अनुभवा”.
सुनीलच्या फोटोवर मजेदार पोस्ट
सुनीलच्या पोस्टवर चाहत्यांच्या मजेदार प्रतिक्रिया येत आहेत. एकाने लिहिले, ‘कांद्याची किंमत काय आहे सर?’ दुसऱ्याने कमेंट केली, ‘भाऊ, तुम्ही किलोसाठी किती पैसे घेता? तुम्ही घरी ऑर्डर पाठवता का? असे लिहिले’ एकाने तर द कपिल शर्मा शोचा संदर्भ देत ‘RIP’ असे लिहिले.