
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. 7 ते 8 मे पासून भारतीय सैन्याने पाकिस्तानचे सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले उद्ध्वस्त केले. देशातील प्रत्येकजण भारतीय सैन्याचे आणि सरकारचे कौतुक करताना दिसत आहे. त्यात अनेक सेलिब्रिटी देखील आहेत जे वेळोवेळी पोस्टच्या माध्यमातून किंवा व्हिडीओच्या माध्यमातून ‘ऑपरेशन सिंदूर’ ला पाठिंबा देत आहेत. त्यातच आता एका प्रसिद्ध अभिनेत्याने कौतुकास्पद निर्णय घेत त्याच्या चाहत्यांना खुश केलं आहे. त्याने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होताना दिसत आहे.
प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा निर्णय; सर्वत्र होतंय कौतुक
हा अभिनेता बॉलिवूडपासून ते साउथपर्यंत सर्वांच्याच मनातील एक लोकप्रिय अभिनेता आहे. या अभिनेत्याने भारतीय सैन्याचा वेगळ्या पद्धतीने सन्मान केला आहे. या अभिनेत्याने त्याच्या फॅशन ब्रँडमधून मिळणाऱ्या कमाईचा एक भाग भारतीय सैन्यासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे.
#VijayDeverakonda to Donate Portion of RWDY Sales to Indian Armed Forces. pic.twitter.com/GxTEEjli6s
— Gulte (@GulteOfficial) May 9, 2025
वाढदिवसाच्या निमित्ताने केली घोषणा
हा अभिनेता म्हणजे विजय देवरकोंडा. होय विजय देवरकोंडा हे दक्षिण चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्याने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विजय देवरकोंडाने 9 मे रोजी त्याचा 36 वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी त्याने ही घोषणा केली आहे की तो त्याच्या फॅशन ब्रँड RWDY मधून मिळणाऱ्या कमाईचा एक हिस्सा हा भारतीय सैन्याला देणार आहे.
म्हणाला, ‘मेड फॉर इंडिया अशी भावना असायला हवी….’
विजय देवरकोंडाने सोशल मीडियाद्वारे याची घोषणा केली आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. विजय देवरकोंडा त्याच्या चाहत्यांसाठी काहीना काही पोस्ट शेअर करतच असतो. त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की, ‘केवळ मेड इन इंडिया नाही, मेड फॉर इंडिया, काही काळासाठी RWDY विक्रीतून मिळणाऱ्या कमाईचा एक हिस्सा भारतीय सेनेला दिला जाईल, जय हिंदी.’ त्याच्या या निर्णयाचं सर्वजण कौतुक करत आहेत.