Gufi Paintal Death | पंचतत्वात विलीन शकुनी मामा, कुटुंबियांनी गुफी पेंटल यांना दिला भावूक होत अखेरचा निरोप

महाभारतामध्ये शकुनी मामाची भूमिका साकारणारे अभिनेते गुफी पेंटल यांनी जगाचा निरोप घेतलाय. मुंबईमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. गुफी पेंटल यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. आज सकाळी 9 वाजता त्यांची प्राणज्योत मावळलीये.

Gufi Paintal Death | पंचतत्वात विलीन शकुनी मामा, कुटुंबियांनी गुफी पेंटल यांना दिला भावूक होत अखेरचा निरोप
| Updated on: Jun 05, 2023 | 6:49 PM

मुंबई : महाभारतामध्ये शकुनी मामाची भूमिका साकारणारे अभिनेते अर्थात गुफी पेंटल (Gufi Paintal) यांनी जगाचा आज निरोप घेतलाय. मुंबईत (Mumbai) उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. गुफी पेंटल यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. गुफी पेंटल यांनी वयाच्या 78 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. विशेष म्हणजे सकाळी आठ वाजता ते बोलले आणि त्यानंतर त्यांना झोप लागली. झोपमध्येच गुफी पेंटल यांचे निधन (Death) झाले. गुफी पेंटल यांचे निधन सकाळी नऊ वाजता झाल्याचे कळत आहे. तीन दिवसांपूर्वी गुफी पेंटल यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गुफी पेंटल यांना ज्यावेळी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी त्यांची तब्येत नाजूकच होती. विशेष म्हणजे ते उपचाराला प्रतिसाद देखील देत होते. मात्र, अचानक त्यांचे निधन झाले. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गुफी पेंटल यांच्या निधनाचे दु:ख हे व्यक्त केले आहे.

गुफी पेंटल यांना हृदयविकाराचा आजार होता. नुकताच गुफी पेंटल हे पंचतत्वमध्ये विलीन झाले आहेत. मुंबईतील ओशिवारा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुफी पेंटल यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. गुफी पेंटल यांच्या अंत्यसंस्कार वेळी कुटुंबिय ढसाढसा रडताना दिसले.

गुफी पेंटल यांनी अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. गुफी पेंटल यांचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. महाभारतामधील शकुनी मामाच्या भूमिकेने गुफी पेंटल यांना एक वेगळी आणि खास ओळख ही मिळाली होती. गुफी पेंटल यांच्या तब्येतीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सतत चढउतार हे बघायला मिळत होते.

गुफी पेंटल यांच्या तब्येतीबद्दल सतत त्यांचा पुतण्या हेल्थ अपडेट देत होता. उपचाराला प्रतिसाद गुफी पेंटल हे देत असल्याचे सांगितले गेले होते. चाहत्यांना देखील अपेक्षा होती की, गुफी पेंटल हे हे लवकरच बरे होतील. मात्र, त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांमध्येही दु:खाचे वातावरण हे बघायला मिळत आहे.