मला मुली आवडतात, मी महिलांसोबत रिलेशनमध्ये… प्रसिद्ध अभिनेत्रीचा थेट खुलासा, म्हटले अनेक..
अभिनेत्री आकांक्षा चमोला हिने नुकताच धक्कादायक खुलासा केला. पहिल्यांदाच ती तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसली. आकांक्षा चमोला हिचे बोलणे ऐकून सर्वांचा धक्का बसला. आता तिच्या विधानानंतर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

टीव्ही अभिनेत्री आकांक्षा चमोला ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. पहिल्यांदाच अभिनेत्रीने लॉक अप 2 या रिअॅलिटी शोमध्ये तिच्या खासगी आयुष्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला. तिने अशा गोष्टीबद्दल कॅमेऱ्यासमोर सांगितले की, लोक त्यावर बोलण्यासही घाबरतात. पहिल्यांदाच तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल इतका मोठा खुलासा केला. शोदरम्यान आकांक्षाने कबूल केले की, लग्नापूर्वी तिला स्त्रियांबद्दल आकर्षण वाटायचे. ती काही महिलांसोबत रिलेशनशिपमध्येही होती. तिला महिला आवडतात… लोक काहीही बोलू पण या नात्याला ती एक सुंदर प्रेम म्हणून नाव देते. मी महिलांकडे आकर्षत होते, हे देखील तिने मान्य केले. यादरम्यान सूत्रसंचालक रितेश देशमुख आणि फराह खान यांनी आकांक्षा चमोला हिचे काैतुक केले.
कोणी या गोष्टींवर अजिबात बोलत नाही पण तिने ही हिंमत केल्यानंतर तिचे काैतुक करण्यात आले. आकांक्षा चमोला हिला शोमध्ये तिच्या खासगी आयुष्याबद्दल विचारण्यात आले. यावेळी तिने सांगितले की, लग्नापूर्वी ती काही महिलांसोबत रिलेशनमध्ये होती. तिला महिला आवडत. मी मुलींकडे आकर्षिक होत. मला वाटते की, महिलांमध्ये माझा सेफ झोन आहे. मला स्त्रियांमधील ती एक वेगळी ऊर्जा मिळते.
जेव्हा मी माझ्या स्वभावातील त्या पैलूचा स्वीकार करते, तेव्हा मला सर्वाधिक आनंद होतो. लोक अनेकदा म्हणतात की दोन स्त्रिया कधीच चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत. त्यांच्या एक स्पर्धा निर्माण होते आणि जल असते. माझ्या दृष्टीने प्रत्येक स्त्री सुंदर आहे. माझ्या मनात स्त्रियांविषयी केवळ प्रेमच आहे. समाज याला काहीही नाव देवो, पण माझ्यासाठी हे केवळ निखळ प्रेम आहे, असेही अभिनेत्री म्हटले.
अभिनेत्रीने पहिल्यांदाच मान्य केले की, लग्नाअगोदर ती काही महिलांसोबत रिलेशनमध्ये होती. अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठी खळबळ उडालीये. टीव्ही अभिनेता गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांचा घटस्फोट होत आहे. लग्नाच्या 10 वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आकांक्षा चमोलाने शोमध्ये वैवाहिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला. गौरवशी घटस्फोट घेणार असून गेल्या वर्षभरापासून आम्ही वेगवेगळे राहत असल्याचेही तिने जाहीर केले.