महिन्यात 5 ते 6 वेळा शरीरसंबंध, पैशांच्या बदल्यात अभिनेत्रीला धक्कादायक ऑफर; ऐकून रितेश देशमुखही हैराण..

कास्टिंग काउच आणि बॉलिवूड यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यातच एका अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला. एका प्रतिष्ठित व्यक्तीकडे पैसे घेण्यासाठी गेल्यावर आपल्यसोबत नक्की काय घडले हे तिने सांगितले. तिचे बोलणे ऐकून फराह खान आणि रितेश देशमुखलाही धक्का बसला होता.

महिन्यात 5 ते 6 वेळा शरीरसंबंध, पैशांच्या बदल्यात अभिनेत्रीला धक्कादायक ऑफर; ऐकून रितेश देशमुखही हैराण..
Actress
| Updated on: Aug 16, 2026 | 6:22 PM

लॉकअपमध्ये सहभागी झालेले स्पर्धेक मोठे खुलासे करताना दिसले. त्यातच रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि मॉडेल आकांक्षा चाैधरी हिने धक्कादायक खुलासा केला होता. आकांक्षाचे बोलणे ऐकून रितेश देशमुखलाही मोठा धक्का बसला होता. कास्टिंग काउचबद्दल तिने खुलासा केला होता. शोचा फिनाले धमाकेदार पद्धतीने झाला. मात्र, आकांक्षाने केलेल्या खुलाश्याची चर्चा होतंय. आकांक्षा हिने म्हटले की, मला एका फॅशन शोमध्ये सहभागी व्हायचे होते. पण माझ्या पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. एका मोठ्या व्यक्तीसोबत माझी ओळख होती. मी त्याबाबत अधिक माहिती सांगू इच्छित नाही. ते यापूर्वी एका साैंदर्य स्पर्धेत परीक्षक म्हणून आले होते आणि तिथेच माझी ओळख त्यांच्यासोबत झाली होती. मी त्यांच्यासोबत संपर्क साधला. त्यांनी अनेक लोकांना आर्थिक मदत केल्याचे मी ऐकले होते.

मग मी त्यांना मदतीसाठी फोन केला. दोन तीन महिन्यांसाठी मला मदत करू शकता का? असे मी त्यांना विचारले. माझ्याकडे काैशल्य होते, शिक्षण होते आणि मला हे चागंल्याप्रकारे माहिती होते की, मी दोन ते तीन महिन्यात त्यांचे घेतलेले कर्ज आरामात फेडू शकते. मी ज्यावेळी त्या व्यक्तीकडे मदत मागितली तर त्यांनी मला मदत करण्यास तात्काळ होकार दिला.

मला त्यांनी त्यांच्या घरी बोलावले होते. मी त्याठिकाणी पहिल्यांदाच गेले नव्हते तर त्यापूर्वीही एकदा माझ्या मार्गदर्शकांसोबत गेले होते. पण मदत मागायला गेले होते, त्यावेळी त्यांनी मला बघता क्षणीच मिठी मारली. त्यानंतर जे घडले ज्याचा मी साधा विचारही केला नव्हता. त्याने मला फक्त मिठी मारली नाही तर त्याने माझ्यासमोर धक्कादायक मागणी ठेवली. तो माझ्या अंगाहून हात काढत नव्हता.

मी त्याला दूर ढकलून दिले. तो खाली बसला होता. त्याने मला म्हटले की, तू आता मोठी झाली. जर त्यावेळी तू माझे ऐकले असते तर आता तू मोठ्या प्रोजोक्टमध्ये काम करत असतीस. तू आता माझ्याकडे आलीस मी तुला पैसे देतो. पण त्या बदल्यात तुला माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवायची होती. हेच नाही तर आकांक्षाने सांगितले की, त्याने सर्व वेळापत्रक तयार करून ठेवले होते. त्याला आठवड्यातून 5 ते 6 वेळा माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवायची होती. आकांक्षाचे बोलणे ऐकून फराह खान आणि रितेश देशमुख याला धक्का बसला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us