प्रसिद्ध अभिनेत्रीच्या व्हिडीओमुळे खळबळ… म्हणाली, ‘माझ्या मागे अनेक क्रिकेटर, सूर्यकुमार तर…’

'माझ्या मागे अनेक क्रिकेटर, सूर्यकुमार तर...', प्रसिद्ध अभिनेत्रीने केलेल्या दाव्यामुळे सर्वत्र खळबळ... सोशल मीडियावर व्हिडीओ सर्वत्र व्हायरल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा...

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या व्हिडीओमुळे खळबळ... म्हणाली, माझ्या मागे अनेक क्रिकेटर, सूर्यकुमार तर...
सूर्यकुमार यादव
| Updated on: Dec 31, 2025 | 12:07 PM

अभिनेत्री आणि मॉडेल खुशी मुखर्जी हिचं एक मोठं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खुशी हिने सर्वांसमोर असा दावा केला आहे की, भारतीय टी-२० आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव पूर्वी तिला वारंवार मेसेज करायचा. एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला सारख्या रिअॅलिटी शोमधून स्वतःची ओळख भक्कम करणाऱ्या खुशीने नुकताच एका संवादादरम्यान हे विधान केलं, जे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. खुशी हिच्या व्हिडीओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे. सध्या सर्वत्र खुशी हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

काय म्हणाली खुशी मुखर्जी…

खुशी म्हणाली, ‘मला कोणत्यात क्रिकेटरला डेट करायचं नाही… माझ्या मागे अनेक क्रिकेटर लागले होते. सूर्यकुमार यादव तर मला पूर्वी वारंवार मेसेज करायचा… पण आता आमचं जास्त बोलणं होत नाही… मला कोणासोबतच नातेसंबंध ठेवायचं नाही… कोणासोबत माझ्या नावाची चर्चा व्हावी असं देखील मला नको आहे.. आणि ते मला आवडणार देखील नाही…’ असं देखुल खुशी म्हणाली.

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया…

खुशीच्या या स्पष्ट विधानावर सोशल मीडियावर तात्काळ प्रतिक्रिया उमटल्या आहेत, सूर्याचे नाव घेतल्यावर अनेक नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहे. काहींनी खुशी हिच्यावर निशाणा साधला. फक्त लोकप्रियता मिळवण्यासाठी असं वक्तव्य करत असं… अनेकांनी म्हटलं आहे. सूर्यकुमार याच्याबद्दल सांगायचं झालं तर, 2016 मध्ये सूर्यकुमार याने देविशा शेट्टी हिच्यासोबत लग्न केलं आहे.

खुशी मुखर्जी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, खुशी हिनो 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ सिनेमा अंजली थुराईद्वारे अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर, ‘डोंगा प्रेमा’ आणि ‘हार्ट अटॅक’ सारख्या तेलुगू सिनेमांमध्ये आणि त्यानंतर हिंदी सिनेमा ‘श्रृंगार’ मध्ये देखील अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारली. अनेक वेबसीरिजमध्ये देखील तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

सोशल मीडियावर देखील खुशी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.