सर्वात श्रीमंत अभिनेत्री, जिचे होते 100 पेक्षा जास्त अफेयर्स, खऱ्या प्रेमासाठी चक्क जळत्या ओव्हनमध्ये घातलेला चेहरा

अशी एक दुर्दैवी अभिनेत्री, जिने खऱ्या प्रेमासाठी चक्क जळत्या ओव्हनमध्ये घातलेला आपला चेहरा. जिचे 100 पेक्षा जास्त लोकांसोबत होते अफेयर्स.

सर्वात श्रीमंत अभिनेत्री, जिचे होते 100 पेक्षा जास्त अफेयर्स, खऱ्या प्रेमासाठी चक्क जळत्या ओव्हनमध्ये घातलेला चेहरा
| Updated on: May 27, 2026 | 6:24 PM

प्रेम माणसाला कोणत्या टोकाला नेऊ शकते, याची अनेक उदाहरणे इतिहासात आणि चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतात. लैला-मजनू, हीर-रांझा यांसारख्या प्रेमकथांमध्ये प्रेमासाठी जीव देणाऱ्या प्रेमी युगुलांच्या कथा आजही प्रसिद्ध आहेत. मात्र प्रेमासाठी कुणी चक्क जळत्या ओव्हनमध्ये स्वतःचा चेहरा घातला असेल, तर ही गोष्ट ऐकून कोणालाही धक्का बसेल. पण अशी धक्कादायक घटना प्रसिद्ध फ्रेंच अभिनेत्री ब्रिजिट बार्डो यांच्या आयुष्यात घडली होती.

ब्रिजिट बार्डो या फ्रान्समधील अत्यंत श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबातून होत्या. लहानपणापासूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक होते. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यांनी प्रसिद्ध Elle मॅगझिनसाठी कव्हर गर्ल म्हणून फोटोशूट केले होते. त्यानंतर त्या एका रात्रीत चर्चेत आल्या. मात्र त्यांच्या वडिलांचा स्वभाव अत्यंत कडक होता. मुलीने चित्रपटसृष्टीत काम करावे, हे त्यांना अजिबात मान्य नव्हते. त्यामुळे ब्रिजिट यांना ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न घरच्यांकडून केला जात होता.

पहिल्याच भेटीत दिग्दर्शकाच्या प्रेमात

चित्रपटांमध्ये करिअर करण्यासाठी ब्रिजिट एका ऑडिशनला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची भेट प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथालेखक रॉजर वदिम यांच्याशी झाली. ऑडिशनमध्ये रॉजर यांनी ब्रिजिट यांना नाकारले पण ब्रिजिट मात्र पहिल्याच भेटीत त्यांच्या प्रेमात पडल्या. हळूहळू दोघांमध्ये गुप्त प्रेमसंबंध सुरू झाले. ब्रिजिट यांनी मनोमन ठरवले होते की, आयुष्यभर त्या रॉजर यांच्यासोबतच राहणार.

या प्रेमसंबंधाची माहिती कुटुंबाला मिळताच घरात मोठा वाद निर्माण झाला. ब्रिजिट यांच्या घरच्यांनी त्यांना रॉजर यांना भेटण्यास सक्त मनाई केली. घरच्यांच्या विरोधामुळे आणि बंधनांमुळे ब्रिजिट मानसिकदृष्ट्या खूप खचल्या होत्या. संताप आणि नैराश्यात त्यांनी एक धक्कादायक पाऊल उचलले. त्यांनी किचनमधील ओव्हन सुरू करून चक्क जळत्या ओव्हनमध्ये स्वतःचा चेहरा घातला. सुदैवाने त्याच वेळी कुटुंबातील सदस्यांची नजर त्यांच्यावर पडली. त्यांनी तात्काळ ब्रिजिट यांना ओव्हनपासून दूर खेचले आणि त्यांचा जीव वाचला.

मुलीच्या हट्टापुढे पालकांचा नाईलाज

ब्रिजिट यांच्या या भयानक कृतीनंतर त्यांच्या पालकांना मोठा धक्का बसला. आपल्या मुलीचे प्रेम किती टोकाचे आहे, याची त्यांना जाणीव झाली. अखेर मुलीच्या हट्टापुढे नमते घेत त्यांनी रॉजर वादिम यांच्यासोबतच्या लग्नाला होकार दिला. ब्रिजिट बार्डो यांच्या आयुष्यातील हे अनेक धक्कादायक किस्से लेखक जिनेट विन्सेन्डो यांनी लिहिलेल्या Brigitte Bardot: The Life, The Legend, The Movies या चरित्रग्रंथात नमूद करण्यात आले आहेत.

Follow Us