AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! बलुचिस्तान पाकिस्तानच्या हातातून निसटलं; मोठी घडामोड आता थेट…

पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे, बलुचिस्तान जवळपास पाकिस्तानच्या हातातून निसटल्यात जमा आहे. पाकिस्तानात घडामोडींना वेग आला असून, बलुच नेत्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! बलुचिस्तान पाकिस्तानच्या हातातून निसटलं; मोठी घडामोड आता थेट...
पाकिस्तानला मोठा धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 17, 2026 | 6:32 PM
Share

पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानच्या हातातून आता जवळपास बलुचिस्तान निसटल्यात जमा आहे. बलुचिस्तानकडून आधी स्वतंत्र देशाची घोषणा करण्यात आली, त्यानंतर बलुचिस्तानने आपलं राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज देखील जाहीर केला. आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे बलुचिस्तान स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी असलेल्या नेत्यांनी बलुचिस्तानची स्वतंत्र करन्सी देखील जारी केली आहे. ‘बलोची फालूस’ असं या चलनाला नाव देण्यात आलं आहे.सोशल मीडियावर या चलनाचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत, त्यामुळे आता पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

बलूच बंडखोरांकडून थेट जाहीर करण्यात आलं आहे की, आता बलुचिस्तान हा पाकिस्तानचा भाग राहिलेला नाहीये, आम्ही आमची प्रशासकीय व्यवस्था, राष्ट्रीय प्रतिक आणि नवं चलन देखील जारी केलं आहे. मात्र जरी बलूच बंडखोरांकडून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यांची घोषणा करण्यात आली असली तरी देखील अजूनही, कोणत्याही प्रशासकीय व्यवस्थेकडन अथवा देशांकडून बलुचिस्तानचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यात आलेलं नाहीये. मात्र यामुळे पाकिस्तानची डोकेदुखी नक्कीच वाढली आहे.

बलूच नेता मीर यार बलोच याने ट्विटरवर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. त्याने ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ असं नामकरण देखील केलं आहे. आमची नवी प्रशासकीय व्यवस्था अस्तित्वात आली आहे. आता बलुचिस्तानचा नवा राष्ट्रध्वज असेल, तसेच नवं राष्ट्रगीत असेल आम्ही नवी करन्सी ‘बलोची फालूस’ देखील जारी केलं आहे, असं मीर यार बलोच याने म्हटलं आहे. मात्र अद्यापपर्यंत या नव्या करन्सीला जगातील कोणत्याही देशाने मान्यता दिलेली नाहीये, परंतु यामुळे पाकिस्तानला आता चांगलाच घाम फुटला आहे.

पीओकेमध्येही आंदोलन 

दरम्यान दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये देखील आंदोलन सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला होता, या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला, त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आता वातावरण चांगलंच तापलं आहे. पीओकेमधून देखील स्वातंत्र्याची मागणी सुरू झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारची आता मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार