दीपिका पदुकोणचा नो मेकअप लूक होतोय व्हायरल, फोटो पाहून फॅन्स म्हणाले…

अभिनेत्री दीपिका पदुकोणला आपण अनेक फॅशनेबल स्टाइलमध्ये पाहिले आहे. तिच्या फॅशन सेन्सने खूप कौतुक होते. पण आता दीपिकाने मेकअपशिवाय स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्याला सोशल मीडियावर खूप व्ह्यूज मिळत आहेत.

दीपिका पदुकोणचा नो मेकअप लूक होतोय व्हायरल, फोटो पाहून फॅन्स म्हणाले...
Image Credit source: instagram
| Updated on: May 25, 2023 | 4:04 PM

Deepika Padukone No Makeup Look : बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) तिच्या चित्रपटांद्वारे चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करताना दिसते. तसेच तिच्या सौंदर्याने अनेक चाहते प्रभावितही होतात. तिच्या फॅन्सची काही कमतरता नाही. ती तर तरूण पिढीच्या हृदयाची धडकन आहे, असे म्हटले जाते. अभिनेत्रीच्या लूकवर आणि तिच्या साधेपणावर चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. या दरम्यान अलीकडेच दीपिका पडूकोणने नो मेकअप लूक शेअर केला आहे. तो फोटो पाहून चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

दीपिकाने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती मेकअपशिवाय दिसत आहे. यामध्ये तिचा चेहरा मात्र पूर्ण दिसत नाही. फोटोत तिने तिचा चेहरा टोपीने झाकला आहे. या फोटोमध्ये ती हिरव्या रंगाच्या कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसत आहे. फोटो पाहून असे दिसते की अभिनेत्री कुठेतरी शांत ठिकाणी आराम करत आहे. यासोबतच अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये सूर्याचा एक इमोजी शेअर केला असून ती सूर्यप्रकाशाचा आनंद लुटताना दिसत आहे.

 

चाहत्यांच्या प्रतिक्रियांना आले उधाण

दीपिका पदुकोणच्या या नो मेकअप लूकबद्दल चाहते बोलत आहेत. एका व्यक्तीने लिहिले- ईस्ट ऑर वेस्ट, दीपिका पदुकोण इज बेस्ट. तर दुसर्‍या व्यक्तीने लिहिले – चेहरा है या चांद खिला है…. काही युजर्सन तिचा हा लूक खूप डॅशिंग वाटतोय. याशिवाय अनेक चाहते तिच्या फोटोंवर फायर आणि हार्ट इमोजी शेअर करत आहेत.

दीपिकाच्या या फोटोला अवघ्या चार तासांत 6 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. आपल्या साधेपणाने ही अभिनेत्री पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकत आहे.

 

आगामी चित्रपट कोणते ?

कामाबद्दल बोलायचे झाले तर, दीपिका यापूर्वी पठाण चित्रपटात दिसली होती. यानंतर ही अभिनेत्री जवान, प्रोजेक्ट के आणि फायटर सारख्या चित्रपटांचा भाग आहे.