‘अजून किती बॉयफ्रेंड बनवशील…’, ब्रेकअपनंतर ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने धरला श्रीमंत व्यक्तीचा हात; सर्वांसमोर किस त्यानंतर…

| Updated on: Jun 10, 2023 | 5:35 PM

नव्या बॉयफ्रेंडसोबत 'बिग बॉस' फेम अभिनेत्री स्पॉट; त्याने सर्वांसमोर किस केलं आणि म्हणाला...; नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप... व्हिडीओ व्हायरल

अजून किती बॉयफ्रेंड बनवशील..., ब्रेकअपनंतर बिग बॉस फेम अभिनेत्रीने धरला श्रीमंत व्यक्तीचा हात; सर्वांसमोर किस त्यानंतर...
Follow us on

मुंबई : झगमगत्या विश्वात कधी कोणाचं कोणासोबत जोडलं जाईल सांगता येत नाही. शिवाय कधी कोणाचं ब्रेकअप आणि घटस्फोट होईल याचा देखील अंदाज नसतो. सध्या ‘बिग बॉस ओटीटी’ फेम अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची तुफान चर्चा रंगत आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ विजेती दिव्या अग्रवाल हिच्या नावाची चर्चा वरुण सूद याच्यासोबत तुफान रंगली. पण आता दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. सध्या दिव्या बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकर याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिवाय दोघांच्या साखरपुड्याच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. अनेक ठिकाणी दिव्याला नवा बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकर याच्यासोबत स्पॉट देखील करण्यात आलं. पण आता एक व्हिडीओमुळे अपूर्व पाडगावकर आणि दिव्या तुफान चर्चेत आली आहे.

दिव्या आणि बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकर यांनी नुकताच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी मीडियासमोर पोझ देताना अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकर असं काही म्हणाला ज्यामुळे सोशल मीडियावर दोघांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. सध्या सर्वत्र दिव्या आणि अपूर्व यांच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

कार्यक्रमात पोहोचल्यानंतर दिव्या आणि अपूर्व पापाराझींनी पोझ देत होते. अशात अपूर्व याने सर्वांसमोर दिव्याला किस केलं आणि म्हणाला, ‘मी रात्रभर करु शकतो..’ सध्या सर्वत्र दिव्या आणि अपूर्व यांच्या व्हिडीओची चर्चा आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हिडीओवर नेटकरी संताप व्यक्त करत आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘अजून किती बॉयफ्रेंड बनवशील…’, तर दुसऱ्या नेटकऱ्याने ‘किती दिवसांचं प्रेम..’ असं म्हणत दिव्या आणि अपूर्व यांच्या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे. वरुण सूद याच्यापासून विभक्त झाल्यानंतर देखील अनेकांनी दिव्यावर निशाणा साधला आहे..

वरुण आणि दिव्या यांची ओळख एका कार्यक्रमात झाली होती. कालांतराने पहिल्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर जवळपास चार वर्ष वरुण आणि दिव्या यांनी एकमेकांना डेट केलं. अखेर दिव्याने ब्रेकअपची घोषणा केली आणि अपूर्व पाडगावकर याच्यासोबत साखरपुडा केला.