AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKHH : ‘साजन जी घर आए’ मध्ये सलमान नाही तर, होता ‘डुप्लीकेट’; अनेक वर्षांनंतर अखेर सत्य समोर

'साजन जी घर आए' गाण्यात भन्नाट डान्स करणारा समलान खान नव्हता; अखेर अभिनेत्याच्या 'डुप्लीकेट'चं सत्य अनेक वर्षांनंतर समोर

KKHH : 'साजन जी घर आए' मध्ये सलमान नाही तर, होता 'डुप्लीकेट'; अनेक वर्षांनंतर अखेर सत्य समोर
| Updated on: Jun 10, 2023 | 4:23 PM
Share

मुंबई : 90 च्या दशकातील सिनेमांची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. 90 च्या दशकातील काळ हा बॉलिवूडचे सोनेरी दिवस म्हणून प्रसिद्ध आहे. 90 च्या दशकातील सिनेमांची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगत असते. अशात दिग्दर्शक करण जोहर याचा ‘कुछ कुछ होता है’ सिनेमा तर आज प्रत्येकाला आठवत असेलच. सिनेमा साकारण्यासाठी करणच्या समोर अनेक अडचणी होत्या. एका मुलाखतीत खु्द्द करण याने सांगितलं होतं की, सिनेमात अमन ही भूमिका साकारण्यासाठी कोणताही अभिनेता तयार नव्हता. तेव्हा अभिनेता सलमान खान दिग्दर्शकाच्या मतदीसाठी धावून आला होता. आता अनेक वर्षांनंतर दिग्दर्शक आणि कोरियोग्राफर फराह खान हिने ‘कुछ कुछ होता है’ सिनेमा संबंधीत एक मोठं सत्य उघड केलं आहे.

कोरियोग्राफर फराह खान लवकरच ‘इंडियाज बेस्ट डांसर’ रिऍलिटी शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. शोमध्ये सलमान खान याची डुप्लिकेटची भूमिका करणारी रित्झी देखील असणार आहे. ‘कुछ कुछ होता है’मधील ‘साजन जी घर आए’ गाण्यासाठी रित्झीने प्रचंड मदत केली.. असा खुलासा खु्द्द फराहने केला आहे.

‘कुछ कुछ होता है’मधील ‘साजन जी घर आए’ गाणं रित्झीमुळेच यशस्वी झालं असं देखील फरहा यावेळी म्हणाली. सिनेमात रित्झीनेच सलमान खानचा डुप्लिकेट बनून गाणं पूर्ण केलं. कारण सलमान खान याच्याकडे अधिक वेळ नव्हता. तो फक्त दोन ते तीन तास सेटवर यायचा.. अशा परिस्थितीत फराहने डुप्लिकेटच्या मदतीने संपूर्ण गाणं शूट केलं आणि ते गाणं प्रचंड हीट झालं.

सध्या सर्वत्र ‘इंडियाज बेस्ट डांसर’ रिऍलिटी शोच्या प्रोमोची तुफान चर्चा रंगत आहे. प्रोमोमध्ये फराह खान म्हणाली, ‘रित्झी प्रचंड क्यूट होता. ‘साजन जी घर आए’ गाणं शूट करण्यासाठी रित्झीने मदत केली.’ सध्या सर्वत्र सलमान खान याचा डुप्लीकेट रित्झी याची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, २००१ मध्ये करण जोहरने सांगितलं होतं की, ‘कुछ कुछ होता है’ सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारण्यासाठी कोणताही अभिनेता तयार नव्हता. अनेक अभिनेत्यांनी अमनच्या भूमिकेसाठी नकार दिला होता. अशात करण प्रचंड चिंतेत असताना सलमान खान याच्या घरी गेला आणि भाईजानने देखील कोणताही विचार न करता तात्काळ अमन या भूमिकेसाठी होकार दिला.

सलमान खान याने क्षणाचाही विलंब न करता दिलेल्या होकारामुळे करण देखील हैराण होता. तेव्हा सलमान खान याने ‘कुछ कुछ होता हैं’ सिनेमात करण जोहर याचे वडील यश जोहर यांच्यासाठी सिनेमात काम करण्यासाठी होकार दिला होता.

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.