अभिनेत्रीला पाठवायचा प्रायवेट पार्टचे व्हिडीओ, अश्लील मेसेज… एकदाच भेटायला बोलावलं अन्..

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका अभिनेत्रीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघड झाले आहे. या व्यक्तीने तिला प्रायवेट पार्टचे व्हिडीओ पाठवले होते.

अभिनेत्रीला पाठवायचा प्रायवेट पार्टचे व्हिडीओ, अश्लील मेसेज... एकदाच भेटायला बोलावलं अन्..
Actress
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 04, 2025 | 1:45 PM

फिल्म इंडस्ट्रीमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका अभिनेत्रीला कोणी तरी व्यक्ती प्रचंड त्रास देत होते. ही व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला प्रायवेट पार्टचे व्हिडीओ आणि अश्लील मेसेज सतत पाठवत होता. अभिनेत्रीने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. एकदा तर या व्यक्तीने हद्दच पार केली होती. तिला भेटायला बोलावले आणि मग जे घडलं ते ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला.

कन्नड आणि तेलुगु टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याऱ्या ४१ वर्षीय अभिनेत्रीने एका माणसाने तिला सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज आणि व्हिडिओ पाठवल्याची तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी नवीन नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. ही संपूर्ण कहाणी तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली, जेव्हा अभिनेत्रीला नवीन नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिने ती स्वीकारली नाही. त्यानंतर तो माणूस दररोज मेसेंजरवर अश्लील मेसेज पाठवू लागला. वैतागून अभिनेत्रीने त्याला ब्लॉक केले.

आरोपीने अभिनेत्रीला खाजगी अवयवांचे व्हिडिओ पाठवले

कथितपणे त्या व्यक्तीने अनेक बनावट खाती तयार केली आणि अभिनेत्रीला अश्लील कंटेंट पाठवत राहिला. यात त्याच्या खाजगी अवयवांचे व्हिडीओही होते. १ नोव्हेंबर रोजी जेव्हा त्या माणसाने पुन्हा मेसेज केला तेव्हा अभिनेत्रीने त्याला बेंगलुरूजवळील नगरभावी सेकंड स्टेज येथील नंदन पॅलेसमध्ये भेटायला बोलावले. जेव्हा दोघांचा आमना-सामना झाला आणि त्या माणसाला आक्षेपार्ह कंटेंट पाठवू नये असे सांगितले तेव्हा त्याने काहीही ऐकण्यास नकार दिला. त्यामुळे अभिनेत्रीला कायद्याचा आधार घ्यावा लागला. तिने पोलिसांत लैंगिक छळाची तक्रार दाखल केली, ज्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अभिनेत्रीला खाजगी व्हिडीओ पाठवणारा व्यक्ती कोण?

अभिनेत्रीला अश्लील मेसेज आणि खाजगी अवयवांचे व्हिडीओ पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख नवीन के. मोन म्हणून झाली आहे. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्याला न्यायालयिन कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी एका जागतिक तंत्रज्ञान भरती कंपनीत डिलिव्हरी मॅनेजर म्हणून काम करतो. या कंपनीचे कार्यालय लंडन, पॅरिस आणि न्यूयॉर्कसह अनेक आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये आहेत. आरोपीने आपले फेसबुक खाते Naveenz नावाने तयार केले आहे.