
हिंदी चित्रपसृष्टीतील अतिशय देखणे, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचं गेल्या वर्षी निधन झालं. नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांनी मुंबईत राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं जाणं हे फक्त देओल कुटुंबासाठी नव्हे तर सर्वांसाठीच वेदनादायक होतं. कुटुंबीय, मित्र-मंडळी, चाहते सर्वांनाच यामुळे मोठा धक्का बसला. दरम्यान 79 व्या बाफ्टा पुरस्कारांच्या “इन मेमोरियम” सेगमेंटमध्ये धर्मेंद्र यांना चित्रपट उद्योगातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. हेमा मालिनी यांनी या सन्मानावर प्रतिक्रिया दिली आहे.
एका वृत्तपत्राशी संवाद साधताना हेमा मालिनी या विषयावर खुलेपणे बोलल्या. ‘ तो खूप सुंदर क्षण होता. त्यांना हा सन्मान मिळण साहजिक होतं. हा फक्त आमचाच नव्हे, संपूर्ण देशासाठी मोठा सन्मानाचा क्षण आहे. यावर्षी इतर कोणत्याही भारतीय कलाकाराला हा ( पुरस्कार) मिळाल नाही. त्यांचे (धर्मेंद्र) यांचे ताहते पक्त भारतात नव्हेत तर जगभरात आहेत. धर्मेंद्र हे केवळ अभिनेता म्हणून नाही तर माणूस म्हणूनही प्रेरणादायक होते. त्यांच्यासारख दुसरं कोणी कधीच बनू शकणार नाही. आम्ही सगळे खूप खुश, उत्साहित आहोत ‘ अशा शब्दात हेमा मालिनी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
एकाच गोष्टीची खंत
हेमा मालिनी यांनी मनातील एक खंतही व्यक्त केली. मी धर्मेंद्र यांच्यासोबत एकदा शेवटची, स्पेस शेअर करू शकले नाही याची खंत राहील. त्यांच्या आणि धर्मेंद्रच्या भागीदारीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “आम्ही भूतकाळात एकत्र जे काम केलं ते एक आठवण आहे. मला आनंद आहे की मी माझ्या अर्ध्याहून अधिक आयुष्यात त्यांची सह-कलाकार आणि जोडीदार होते. ते आता आप्लायत नाहीहयावर विश्वास ठेवणं आजही कठीण आहे. मी त्यांच्याबद्दल विचार कते तेव्हा डोले आपसूक वाहू लागतात. पण आम्हाला या दु:खातून बाहेर पडावचं लागेल. मी स्ट्राँग आहे, पण तरीही कधीतरी कोलमडून पडतेच. सगळे सहकारी, स्पॉट बॉईज, सगळेच उदास आहेत. साहेबांची आठवण येत, असं ते अनेकदा सांगत असतात ” असंही हेमा मालिनी यांनी नमूद केलं.
कुटुंबात कोणंतही टेन्शन नाही
देओल ( दोन्ही कुटुंबात) फॅमिलीमध्ये टेन्शन असल्याच्या अफवांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. घरात, कुटुंबियांमध्ये कोणतीही नकारात्मकता नाही असं हेमा मालिनी यांनी स्पष्ट केलं. पापा (धर्मेंद्र) आहेत ना, पापा सगळं ठीक करतील. ही मुलं (ईशा, आहना) असोत किंवा ती ( सनी , बॉबी). सगळ्याचं धरमजींवर खूप प्रेम होतं. ते सगळे ( देओल भावंडं) एकमेकांवर खूप प्रेम करतात. कुटुंबात नकारत्मक काहीह नाही. धरमजी हे प्रेम, शक्ती आणि मूल्यांचे स्रोत होते, तेच त्यांनी सर्वांना दिलं. आम्ही सगळे ठीक आहोत आणि ही पोकळी आम्ही पूर्ण करू, असं त्यांनी सांगितलं. मी डान्स शोमध्ये व्यस्त आहे, पण जर एखादा चांगला चित्रपट ऑफर झाला तर मी तो करायला तयार असने, असंही हेमा मालिनी यांनी नमूद केलं.