
अनेकदा अभिनेत्री त्यांच्या अभिनयापेक्षा किंवा वैयक्तिक आयुष्यापेक्षाही त्यांच्या एखाद्या स्टेटमेंटमुळे चर्चेत येतात. अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जी कायमच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यासाठी चर्चेत राहते. तिला विचारलेल्या प्रश्नाबद्दल तिने असं काही उत्तर दिलं आहे ज्यामुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
अभिनेत्री ग्लॅमरस जीवनशैलीसाठी ओळखली जाते.
ही अभिनेत्री ग्लॅमरस जीवनशैलीसाठी ओळखली जाते. त्यामुळे तिला काही गोष्टींबद्दलचे प्रश्न विचारणे निरर्थक वाटते. जसं की तिला एका मुलाखतीत दुधाची किंमत विचारण्यात आली. त्यावर तिने ‘मला कसं माहित असले’ अशी प्रतिक्रिया देत हे फार वायफळ प्रश्न असल्याचं तिने म्हटलं. ही सेलिब्रिटी म्हणजे हॉलिवूडची सुंदर अभिनेत्री किम कार्दशियन.
साध्या गोष्टींची किंमतीबाबत अभिनेत्रीला काहीच कल्पना नाही.
किम कार्दशियन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की तिला दुधाची किंमत माहित नाही आणि साध्या गोष्टींची किंमत काय आहे याची तिला काहीच कल्पना नाही. तिची ही मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत किमने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल सांगितले, ज्या व्हायरल होत आहेत.
किराणा मालाच्या कोणत्याही वाढत्या किमतींबद्दल माहित नाही
किम कार्दशियन तिच्या ग्लॅमरस जीवनशैलीसाठी ओळखली जाते, म्हणून तिला दुधाची किंमत, भाज्यांची किंमत असे प्रश्न विचारणे थोडे निरर्थक वाटतात. किम कार्दशियनने खुलासा केला की ती दुधाच्या किंमतीपासून ते किराणा मालाच्या कोणत्याही वाढत्या किमतींबद्दल काहीच माहिती नव्हती.
अभिनेत्रीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं.
तसेच एपिसोडमध्ये, होस्टने कार्दशियनला विचारले की ती दरवर्षी ‘कन्फेस ऑर टेक्स्ट’ या गेम दरम्यान ग्लॅमरवर किती खर्च करते. किमने उत्तर दिले, “हो, खूप जास्त,” किमला दुधासारख्या साध्या गोष्टींची किंमत माहित नसल्याबद्दल सोशल मीडियावर फार ट्रोल करण्यात येत आहे.किम कार्दशियनने फॅशनिस्टा आणि अब्जाधीश आहे म्हणून तिने दैनंदिन उत्पादनांच्या किमतींबद्दल दुर्लक्ष केल्याबद्दल चाहत्यांनी तिच्यावर टीका केली आहे.