प्रसिद्ध अभिनेत्रीच्या फोटोंचा डेटिंग ॲपवर चुकीचा वापर; चाहत्यांकडून मागितली मदत

| Updated on: Mar 08, 2023 | 2:00 PM

प्रसिद्ध अभिनेत्री सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत दिली फोटोंचा चुकीचा वापर झाल्याची माहिती; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल...; सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या फोटोंचा डेटिंग ॲपवर चुकीचा वापर; चाहत्यांकडून मागितली मदत
Follow us on

मुंबई : अनेक जण आता डेटिंग ॲपचा वापर करत आयुष्यातील जोडीदार मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. पण याचा अनेकदा चुकीचा वापर झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या फोटोंचा डेटिंग ॲपवर चुकीचा वापर झाल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेत्री कुशा कपिला हिच्या फोटोंचा डेटिंग ॲपवर चुकीचा वापर झाल्याची माहिती खुद्द अभिनेत्रीने दिली आहे. अभिनेत्रीने काही स्क्रिनशॉट शेअर करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. एवढंच नाही तर अभिनेत्रीने चाहत्यांकडून मदत देखील मागितली आहे. सध्या सर्वत्र कुशा कपिला हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

कुशाने ट्विटरवर काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. पंजाबमधील होशियारपूर येथील 33 वर्षीय सना हिच्या नावाने अभिनेत्रीचे बनावट प्रोफाइल तयार करण्यात आलं आहे. शिवाय प्रोफाईलमध्ये कुशाच्या फोटोंचा वापर करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्री कुशा हिने शेअर केलेल्या स्क्रिनशॉटची चर्चा रंगत आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

स्क्रिनशॉट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘सनाचा आवडता रंग कोणता आहे? ती तिचे नाव दोन Ns ने का लिहते? सनाला कोणतं संगीत आवडतं? तिचा प्रेमावर विश्वास आहे का? तिला एपी ढिल्लन आवडते का? ओळख चोरी करण्याव्यतिरिक्त इतर प्रश्न जे मला रात्री जागे ठेवतील…’ असं अभिनेत्री ट्विट करत म्हणाली आहे.

अभिनेत्री फेक प्रोफाईलबद्दल जाणून घेवून प्रत्येक जण हैराण झाला आहे. काही चाहत्यांनी तर कुशा हिला मदत करण्याचं आश्वासन देखील दिलं आहे. तर काही चाहत्यांनी मात्र अभिनेत्रीची खिल्ली उडवली आहे. एक युजर अभिनेत्रीच्या फोटोवर कमेंट करत म्हणाला, ‘तुला तुझी जुळी बहीण डेटिंग ॲपवर भेटली आहे. तुझ्यासाठी आताचा क्षण भावुक आहे…’ सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

कुशा कपिला हिने तिच्या करियरची सुरुवात ‘सन ऑफ अबीश’ या मालिकेच्या माध्यमातून केली. याआधी कुशाने फॅशन रिपोर्टर आणि कॉपीरायटर म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली होती. अखेर २०१६ नंतर अभिनेत्रीचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होवू लागले. त्यानंतर कुशा कंटेन्ट क्रियेटर म्हणून ओळखीस आली.

2020 मध्ये, अभिनेत्रीने नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीजमध्ये कॅमिओची भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर कुशा कपिला ‘प्लॅन ए प्लान बी’ आणि अक्षय कुमारच्या ‘सेल्फी’ तसेच ‘मसाबा मसाबा’ आणि ‘मायनस वन: न्यू चॅप्टर’ या वेब सीरिजमध्ये झळकली.