अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या कॅनडा टुरने वादळ, का होत आहेत ट्रोल ? आयोजकाचा खुलासा

बॉलीवूडच्या 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित यांच्या कॅनडा टुरने गदारोळ झाला आहे. त्यांनी कॅनडातील शोमध्ये तीन तास उशीर केल्याने चाहत्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. आता आयोजकांनी यावर खुलासा केला आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या कॅनडा टुरने वादळ, का होत आहेत ट्रोल ? आयोजकाचा खुलासा
madhuri dixit
| Updated on: Nov 06, 2025 | 10:06 PM

बॉलीवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित आजही चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहेत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करत असतात. कॅनडात माधुरी दीक्षित त्यांच्या कार्यक्रमात पोहचल्या त्यावेळी लाखोंची गर्दी एक झलक पाहण्यासाठी वाट पहात होती. माधुरी दीक्षित उशीरा आल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या दौऱ्यातील माधुरी दीक्षित यांचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यांना ट्रोलही केले जात आहे. यात या संदर्भात इव्हेंट करणाऱ्यांनी खुलासा केलेला आहे.

माधुरीच्या शोवर आयोजकांची खुलासा

माधुरी दीक्षित यांच्या कॅनडा टुरच्या आयोजकांनी स्पष्ट केले आहे की हा उशीर अभिनेत्रीने केलेला नसून प्रमोटरच्या गैरसमजामुळे झाला होता. माधुरी दीक्षित यांचा कॅनरा दौरा अजूनही सुरु आहे. परंतू यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. टुरमध्ये सहभागी लोकांनी आयोजकांवर टीका केलेली आहे. कार्यक्रमाला झालेला उशीर आणि शोच्या फॉर्मेट संदर्भात दीशाभूल केल्याची तक्रारही झाली आहे. सुरुवातीला स्थानिक आयोजकांनी माधुरीच्या टीमला परफॉर्मन्ससाठी झालेल्या उशीराला त्यांनाच जबाबदार ठरवले होते.नंतर नॅशनल प्रमोटर अतीक शेख यांनी खुलासा केला की माधुरी दीक्षित वेळेत आल्या होत्या. समस्या स्थानिक प्रमोटरच्या गैरसमजामुळे सुरु झाली होती.

पत्रकार परिषेदत यांसदर्भात शेख यांनी सांगितले की हे आयोजन कॉन्सर्ट नव्हती, त्याऐवजी माधुरी सोबत फॅन मीट एण्ड ग्रीट होता. यात फायर साईड चॅट आणि इंटरॅक्टीव्ह सेशन देखील सामील होते. चाहत्यांना चुकीची माहिती देण्यात आली की ही कॉन्सर्ट आहे. त्यामुळे गैरसमज झाला. माधुरीजी या नेहमीच व्यावसायिक वेळेच्या बाबती अचूक राहिल्या आहेत. त्या त्यांच्या ठरलेल्या वेळीच रात्री ९.३० वाजता पोहचल्या आणि ९.४५ ते १०.०० दरम्यान ठरलेल्या प्रमाणे व्यासपीठावर आल्या.

आयोजकांच्या मते इंडियन ऑयडलच्या परफॉर्मर शिवांगी शर्मा आणि तन्मय चतुर्वेदी यांनी सायंकाळी ७.३० ते ९.०० पर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन केले, तर माधुरी दीक्षित यांनी सायंकाळी ५.३० वाजता बजे मीट एंड ग्रीट सेशनमध्ये सहभाग देखील घेतला होता. प्रमोटर्सने सांगितले की अभिनेत्री किंवा त्यांच्या टीमकडून कोणताही उशीर झालेला नाही.स्थानिक प्रमोटर्सने शेअर केलेल्या माहितीमुळे हा गैरसमज झाला.

यूजर्सने केली टीका

माधुरी दीक्षित यांच्या शोला पोहचलेल्या लोकांनी सोशल मीडियावर माधुरी यांच्यावर टीका केली आहे. एका युजरने माधुरींचा व्हिडीओ शेअर करत, म्हटले KR ‘तुम्हाला एक सल्ला देतो.माधुरी दीक्षित यांची टुर कधी अटेन्ट करु नका, आपले पैसे वाचवा’ युजर्सने टीका केली की हा शो तीन तास उशीराने सुरु झाला.आयोजकांनी खास व्यवस्था केलेली नव्हती. एका युजरे म्हटले की मी ११.०५ वाजता निघालो. मला दुसऱ्या दिवशी खूप काम होते. मला खरंच माहिती नाही की आयोजकांनी हे ठरवले की माधुरी १० वाजता स्टेजवर येईल की हा एक्ट्रेसचा निर्णय होता. शो खूपच उशीरा सुरु झाला हा चाहत्यांचा अपमान होता.