
Bollywood Actress Mahima Chaudhry Daughter : बऱ्याच काळापासून बॉलिवूडमधून दृष्टीआड असलेली अभिनेत्री महिमा चौधरीने (Mahima Chaudhry) , गेल्या वर्षी 2025 मध्ये इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन केलं.त्याआधी सुमारे दशकभर तरी ती मोठ्या पडद्यावर दिसली नव्हती. पण आता तिने दुसरी इनिंग सुरू केली असून सध्या ती संजय मिश्रा यांच्यासह एक अतिशय रंजक चित्रपटात काम करत आहे. या मूव्हीमध्ये ती संजय मिश्र यांच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. एवढंच नव्हे तर सध्या महिमा ही तिची लेका अर्यानामुळेही बरीच चर्चेत आहे.
याआधी महिमा अनेकवेळा अर्यानासोबत दिसली होती, ज्यामुळे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले. महिमा चौधरीची लेक अर्याना 18 वर्षांची असून ती डिट्टो तिच्या आईची कॉपी आहे, ती अगदी महिमासारखीच दिसते. अलिकडेच तिच्या शाळेतील तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये अर्याना आणि तिच्या मैत्रिणी नाचताना दिसत आहेत. तो व्हायरल होताच त्यावर लोकांच्या धडाधड कमेंट्स येऊ लागल्या.
मैत्रिणीसोबत केला डान्स
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, अर्याना तिच्या शाळेच्या कॅम्पसमध्ये तिच्या मैत्रिणीसोबत “कंगना तेरा नी” या पंजाबी गाण्यावर नाचताना दिसत आहे. मात्र तेव्हाच मागून एक कर्मचारी येतो आणि त्यांना शूटिंग करण्यापासून रोखतो . पण तरीही अर्याना मस्ती करतच आपल्या मैत्रिणींसोबत तो व्हिडीओ पूर्ण करते. तिचं हास्य आणि क्यूट एक्स्प्रेशन्स यावर चाहत्यांच्या बऱ्याच कमेंट्स आल्या आहेत. अनेक लोक तर अर्यानाला महिमाची कार्बन कॉपी मानतात, तर काही लोक तिची तुलना हॉलिवूड अभिनेत्रीशी करत आहेत.
चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
या व्हिडीओवर खूप कमेंट्स आल्या. एका व्यक्तीने व्हिडिओवर कमेंट लिहील,” ही तर छोटी महिमा.” तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिले, “महिमाची मुलगी बाहुलीसारखी आहे.”. ही महिमाची अगदी कार्बन कॉपी आहे, अशीही कमेंट एकाने केली. तर काही लोकांनी अर्यानाची तुलना थेट हॉलिवूड स्टार सेलिना गोमेझ हिच्याशीच केली. तिचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून सोशल मीडियावर ती खूप लोकप्रिय देखील ठरत आहे.