
परिणीती चोप्रा ही तिच्या ‘चमकिला’ चित्रपटामुळे चर्चेत आहेच, पण लोकांमध्ये ती प्रेग्नेंट असल्याची देखील चर्चा अनेक दिवसांंपासून सुरु आहे. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात तिने काळ्या रंगाचा कफ्तान ड्रेस परिधान केला होता. तिचा हा लूक पाहून ती गर्भवती असल्याची अफवा उडू लागली होती. सोशल मीडियावर युजर्सने म्हटले की, तिने बेबी बंप लपवण्यासाठी सैल कपडे घातले होते. त्यानंतर तिने यावर स्पष्टीकरण देखील दिले होते. तिने म्हटले होते की, जेव्हाही तुम्ही सैल कपडे घालता तेव्हा अशा चर्चा सुरु होतात. सोमवारी परिणीतीने फिटिंग ड्रेस घातला होता. ज्यामुळे तिच्या गरोदरपणाच्या अफवा आता बंद झाल्या आहेत. तिने यासाठी सैल कपडे घालणे सोडून दिले आहे. ती आता घट्ट कपड्यांमध्ये दिसत आहे.
परिणीतीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. व्हिडिओवर लिहिले आहे की, ‘आज मी खूप फिट कपडे परिधान करते कारण जेव्हाही मी काफ्तान ड्रेस घालते…’ या व्हिडिओमध्ये काही बातम्यांचे हेडलाईन दाखवण्यात आले होते. ज्यामध्ये तिच्या प्रेग्नंट असण्याची शक्यता वर्तवली जात होती. या सगळ्यामुळे ती नाराज असल्याचं ती व्यक्त करते. परिणीतीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी माझ्या फिटिंग कपड्यांमध्ये परत आली आहे.’
एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, ‘आता लोकांच्या विचारानुसार कपडे घालावे का.’ एका यूजरने कमेंट करत म्हटले की, ‘परंतु मोठ्या आकाराचे कपडे आरामदायक असतात.’ एकाने लिहिले, ‘तुम्ही खूप सुंदर आहात याकडे दुर्लक्ष करा.’ एकजण म्हणाला, ‘अशा लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका.’
परिणीती चोप्रा आणि दिलजीत दोसांझ स्टारर चित्रपट ‘चमकिला’ 12 एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अली आहेत. ए आर रहमानने संगीत दिले आहे. हा चित्रपट पंजाबी गायक अमर सिंग चमकिला यांच्या जीवनावर आधारित आहे.