मासिक पाळी सुरु असताना दिग्दर्शक पाणी टाकायचा आणि… अभिनेत्रीला सेटवर आलेला भयानक अनुभव

मासिक पाळी दरम्यान अभिनेत्रीला सेटवर आलेला भयानक अनुभव, म्हणाली, 'माझी मासिक पाळी सुरु असताना दिग्दर्शक सतत पाणी टाकायचा आणि...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीने केलेल्या धक्कादायक

मासिक पाळी सुरु असताना दिग्दर्शक पाणी टाकायचा आणि... अभिनेत्रीला सेटवर आलेला भयानक अनुभव
Parvathy Thiruvothu
| Updated on: Jan 14, 2026 | 1:26 PM

झगमगत्या विश्वात काम करणं अभिनेत्रींसाठी फार कठीण असतं. सेटवर शूट करत असताना अभिनेत्रींसमोर असे काही प्रसंग समोर उभे राहतात… जे अत्यंत भयानक असतात. पूर्वी अभिनेत्री कधीच पडद्यामागच्या गोष्टी सांगत नव्हत्या पण आता अभिनेत्री निडरपणे इंडस्ट्रीची काळी बाजू देखील समोर ठेवतात. आता देखील असंच काही झालं आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीने शुटिंग दरम्यान घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे. मासिक पाळी सुरु असताना दिग्दर्शक सतत अभिनेत्रीवर पाणी टाकत होता. शिवाय कपडे बदल्यासाठी देखील त्याने अभिनेत्रीला परवानगी दिली नाही…

सांगायचं झालं तर, हा धक्कादायक प्रकार पार्वती थिरुवोथू या अभिनेत्रीसोबत घडला आहे. पार्वती ही मल्याळम आभिनेत्री आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. ‘मरियान’ सिनेमात काम करत असताना आलेला अनुभव अभिनेत्रीने शेअर केला आहे. ज्यामध्या मुख्य अभिनेत्याची भूमिका धनुष याने साकारली होती.

अभिनेत्री म्हणाली, ‘शुटिंगच्या पहिल्या दिवशी मला पूर्णपणे पाण्यात भिजवलं होतं. सिनेमातील हिरो (धनुष) माझ्यासोबत रोमान्स करत होता. दिग्दर्शक माझ्यावर सतत पाणी टाकत होते. माझ्या लक्षात आलं की, माझ्याकडे दुसरे कपडे नाहीत आणि त्याठिकाणी माझी काळजी घेण्यासाठी देखील कोणीच नव्हतं…’

 

 

‘अखेर मला दिग्दर्शकाला सांगावं लागलं… मला हॉटेलमध्ये जायचं आहे. कारण मला कपडे बदलायचे होते. तेव्हा दिग्दर्शकाने स्पष्ट नकार दिला आणि मला म्हणाला माझ्याकडे इतका वेळ नाही… तेव्हा मला जोरात ओरडून सांगावं लागलं की, मला मासिक पाळी सुरु झाली आहे आणि मला जावंच लागेल… तेव्हा काय करायला हवं हे दिग्दर्शकाला कळलंच नाही… तेव्हा सेटवर फक्त तीन महिला उपस्थित होत्या.’ सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री  पार्वती थिरुवोथू हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती मल्याळम सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांत्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.