
बॉलिवूड असा किंवा टीव्ही इंडस्ट्री. यामधील काही अभिनेत्री अशा आहेत की ज्या त्यांच्या अभिनयासोबत त्यांच्या सौंदर्यामुळे देखील सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात.

अशीच एक अभिनेत्री जिने नवीन वर्षाची सुरुवातीलाच तिचे काही फिटनेसचे फोटो शेअर करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. जिचे नाव प्रिया बापट आहे.

अभिनेत्री प्रिया बापटने तिचे आणि उमेश कामतचे फिटनेस ट्रान्सफॉरमेशनचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

वयाच्या 39 व्या वर्षी प्रिया बापटची फिटनेस पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. त्यासोबतच तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे.

प्रिया बापटने हे फोटोशूट जिममध्ये केलं असून या फोटोमध्ये तिच्यासोबत उमेश देखील वर्कआऊट करताना दिसत आहे. त्यांचे हे फोटो प्रचंड चर्चेत आले आहेत.

एका मुलाखतीत प्रिया बापटने तिच्या फिटनेसचे रहस्य उघड केले होते. ज्यामध्ये तिने नियमित पोषक आहार, व्यायाम आणि पाणी या तीन गोष्टी खूप महत्वाच्या असल्याचे सांगितले होतं.