
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अगस्त्य नंदा काही दिवसांपूर्वीच आजोबा अमिताभ बच्चन यांच्या शो काैन बनेंगा करोडपतीच्या मंचावर आला होता. अमिताभ बच्चनही अगस्त्य नंदा यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. त्यांनी नातवाच्या चित्रपटाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. मुंबईत श्रीराम राघवन यांच्या इक्कीस या चित्रपटाचा प्रीमियर पार पडला. रेड कार्पेटवर अनेक कलाकार उपस्थित होते. या विशेष कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. अभिनेत्री रेखा देखील यादरम्यान पोहोचल्या होत्या. जबरदस्त लूकमध्ये रेखा दिसल्या. गोल्डन रंगाच्या साडीमध्ये रेखा यांचा लूक अधिकच उठून दिसत होता. मात्र, यावेळी रेखा यांनी असे काही केले की, तूफान चर्चा रंगताना दिसत आहे. रेखा यांचे हे कृत्य पाहून नक्कीच जया बच्चन यांचा जळफळाट झाला असावा.
इक्कीस चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हा मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. 25 वर्षीय अगस्त्य याच्यावर भर कॅमेऱ्यासमोर रेखा यांनी प्रेमाचा वर्षाव केला. रेड कार्पेटवर पापाराझींच्या कॅमेऱ्यांमध्ये एक अत्यंत भावूक क्षण कैद झाला. रेखा या सुरूवातीला धर्मेंद्र यांच्या पोस्टसमोर थांबल्या, तिथे त्यांनी हात सोडत धर्मेंद्र यांना आदरांजली वाहिली आणि काही सेकंद तिने थांबल्या.
पुढे त्यानंतर रेखा चित्रपटाच्या पोस्टकडे गेल्या. तिथे काही अभिनेत्यांचे फोटोही होते. मात्र, रेखा यांनी पोस्टरवर असलेल्या अगस्त्य नंदा याच्या फोटोला हात लावत चेहऱ्यावर प्रेमाने स्पर्श केला. मग त्यांनी आर्शिवाद देत एक फ्लाइंग किस अगस्त्य नंदा याच्या फोटोला दिली. रेखा यांचा हा छोटासा हावभाव जोरदार चर्चा आला असून अमिताभ बच्चन यांच्या नातवावर रेखा बच्चन किती प्रेम करतात, हे त्यावरून स्पष्ट झाले.
A moment filled with warmth and affection as Rekha blesses her most beloved Agastya Nanda at the special screening of Ikkis. Rekha wore dark glasses to quietly veil her emotions — a rare sight at such events, as she usually keeps her expressive eyes uncovered.#yogenshah pic.twitter.com/L21xIxoidi
— yogen shah (@yogenshahyogen) December 29, 2025
आता रेखा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ बघताच लोकांना जया बच्चन यांची आठवण येत आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर जया बच्चन मोबाईल फोन फोडून टाकतील असे अनेकांनी म्हटले. अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे अफेअर बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेले आहे. अनेक वर्ष रेखा आणि अमिताभ बच्चन एकमेकांना डेट करत होते.