AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pananad Rasta: राज्यातील पाणंद रस्त्यांची सातबाऱ्यावर नोंद, अर्थसंकल्पीय अधिवेशनात महसलमंत्र्यांची मोठी घोषणा

Pananad Rasta on Satbara: राज्यात 'मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते' योजनेची चर्चा सुरू आहे. योजनेसाठी GIS तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. तर आता पाणंद रस्त्यांची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीची घोषणा आज सभागृहात केली.

Pananad Rasta: राज्यातील पाणंद रस्त्यांची सातबाऱ्यावर नोंद, अर्थसंकल्पीय अधिवेशनात महसलमंत्र्यांची मोठी घोषणा
पाणंद रस्ते योजनाImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 04, 2026 | 4:09 PM
Share

Chandrashekhar Bawankule: ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे. भौगोलिक माहिती प्रणालीची (Geographic Information Systems-GIS) मदत घेऊन मग शिवरस्त्यांना एक भू-सांकेतिक क्रमांक देण्यात येणार आहेच. पण आता या रस्त्यांची थेट सातबारा उतार्‍यावर नोंद होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीची घोषणा आज बुधवारी 4 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे. या रस्त्यावरून भविष्यात वाद उद्भवू नये यासाठी हे डिजिटल रेकॉर्ड सुद्धा तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरून नाहक कोर्टकचेरीचा प्रश्न उद्भवणार नाही.

पाणंद रस्त्यांचे सीमांकन

राज्यातील सर्व शेत रस्त्यांचे अगोदर अचूक सीमांकन करण्यात येईल. यामध्ये रस्त्यांची लांबी, रुंदी, दिशा आणि सीमा निश्चित करण्यात येतील. या सर्व बाबींची नोद साताबारा उतार्‍यावर करण्यात येईल. सातबारा उतार्‍यावरील इतर हक्क या रकान्यात या पाणंद रस्त्यांची नोंद होईल. ग्राम महसूल अधिकारी ही नोंद करतील. संबंधित मतदारसंघातील आमदार दरमहा बैठक घेऊन या कामाचा आढावा घेतील, असे महसूलमंत्र्यांनी जाहीर केले.

रस्त्यांची जाळ्याची माहिती एकाच ठिकाणी

राज्यातील कोणत्या गावात किती रस्ते आहेत, त्यांची स्थिती काय आहे, कोणत्या रस्त्यावर अतिक्रमण आहे. कोणत्या रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यासाठी किती निधी लागला, डागडुजीसाठी किती निधी लागणार याची माहिती आता एकाच संकेतस्थळावर मिळेल. शेत रस्ते, पाणंद रस्ते, हम रास्ते अधिक सक्षम करण्यावर सरकार जोर देत आहे.

संकेतस्थळावर रस्त्यांची कामाची प्रगती, कंत्राटदाराची सर्व माहिती नागरिकांना उपलब्ध होईल. यावर गावागावातील पाणंद रस्त्यांची माहिती उपलब्ध असेल. कोणत्या रस्त्याचे किती काम झाले. कोणत्या प्रकारचा रस्ता आहे. रस्त्याच्या कामाची प्रगती, कंत्राटदार कोण आहे, कामाचा दर्जा नेमका काय आहे याची माहिती शेतकर्‍यांना मिळेल. यामुळे कामातील पारदर्शकता समोर येईल.

CSR Fund मधून निधी

राज्यात पाणंद रस्त्यांसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ योजना सुरू करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेची घोषणा केली होती. शेतात जाण्यासाठी थेट आणि पक्का रस्ता व्हावा हा योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी राज्य सरकार सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करणार असल्याचे बावनकुळे यांनी जाहीर केले. योजनेसाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली मतदारसंघनिहाय समिती स्थापन करण्यात आली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...