5

Rhea Chakraborty | सुशांतला मानसिक आजार, तो नेहमी मॅरिजुआना ड्रग्ज घ्यायचा – रिया चक्रवर्ती

सुशांतला मानसिक आजार असल्याचं रियाने सांगितलं. सुशांतवर मॅरिजुआना ड्रग्ज घेत असल्याचा आरोपही तिने केला.

Rhea Chakraborty | सुशांतला मानसिक आजार, तो नेहमी मॅरिजुआना ड्रग्ज घ्यायचा - रिया चक्रवर्ती
Follow us
| Updated on: Aug 28, 2020 | 10:36 PM

मुंबई : रिया चक्रवर्तीला CBI चौकशीसाठी कधी बोलावणार, याकडे सुशांतच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या होत्या (Rhea Chakraborty On Sushant Singh Rajput). आता अखेर ईडीनंतर सीबीआयच्या प्रश्नांचाही रिया सामना करत आहे. पण, आता हे संपूर्ण प्रकरण फक्त सुशांतच्या मृत्यूपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. तर ड्रग्जच्या अँगलवरुनही रियाच्या अडचणी वाढल्या आहेत (Rhea Chakraborty On Sushant Singh Rajput).

सुशांत सिंहची आत्महत्या की हत्या? याचा तपास करण्यासाठी सीबीआयकडून चौकशीचा सिलसिला सुरु आहे. मात्र, सीबीआयसमोर येण्याआधीच रियाने आपली बाजू स्पष्ट केली. सुशांतला मानसिक आजार असल्याचं रियाने सांगितलं. सुशांतवर मॅरिजुआना ड्रग्ज घेत असल्याचा आरोपही तिने केला.

सध्या रियाच्या विरोधातील बाजू पाहिल्या तर ड्रग्जचा अँगल समोर आल्यानं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा तपास सुरु झाला आहे. एमडी ड्रग्जची विचारणा करणार आहे. रियाचा मेसेजही ईडीच्या हाती लागला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने याप्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणावरुन रियाच्या वडिलांचीही ईडीकडून चौकशी सुरु झाली.

सुशांतला मानसिक आजारी सांगतानाच, रियाच्या व्हॉट्सअॅप चॅटवरुन जे मेसेज ईडीच्या हाती लागलेत, त्यात ड्रग्जचा अँगल समोर आला आहे. मात्र, ड्रग्ज आपण स्वत: घेतले नाहीत. तर सुशांतकरिता समन्वय साधण्यासाठी मेसेज केल्याचं आणि मेसेज व्हॉट्सअॅपवर आल्याचा रियाचं म्हणणं आहे.

“मी कोणतेही ड्रग्ज घेतलेले नाही. मी ड्रग्ज टेस्ट करण्यासाठी तयार आहे. सुशांतला सीबीडी ड्रग्ज द्यायचे नव्हते. सुशांतनेच जया साहाकडेच विचारणा केली होती. त्यासंदर्भात सुशांतचीच बातचित झाली होती. मी फक्त दोघांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करत होती. मी चहामध्ये काहीही टाकलेलं नाही. सुशांतनेच स्वत: काही केलं असेल. सुशांत मॅरिजुआना ड्रग्ज घ्यायचा आणि नेहमीच मला भेटण्याआधीच सुशांत मॅरिजुआनाचं सेवन करायचा. केदारनाथची शूटिंग किंवा त्याआधी सुशांतने हे सुरु केलं होतं. मी सुशांतला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती. मी कधीही सुशांतला ड्रग्ज घेण्यासाठी सांगितलं नाही आणि सुशांतसोबत ड्रग्ज घेतलं नाही”, असं स्पष्टीकरण रियाने दिलं आहे.

ड्रग्ज घेतले नसल्याचं रिया म्हणत असली, तरी 8 मार्च 2017 रोजीच्या चॅटमध्ये रियाने हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याला मेसेज केला. ईडीच्या हाती लागलेल्या मेसेजनुसार, “हार्ड ड्रग्जबद्दल बोलायचं तर मी जास्त घेतलेले नाहीत. एकदा एमडीएमए घेण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे एमडी आहे का?” (Rhea Chakraborty On Sushant Singh Rajput)

“सुशांतला मानसिक आजार होता आणि मॅरिजुआना ड्रग्ज घेत होता”. एवढं सांगण्यावरच रिया थांबली नाही. तर, “सुशांतच्या कुटुंबीयांशी सुशांतचे संबंध चांगले नव्हते”, असा आरोपही रियाने केला. मात्र, रियानेच विष देऊन सुशांतला मारल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केला आहे.

दुसरीकडे रियानं सुशांतच्या अकाऊंटमधून 15 कोटी ट्रान्सफर केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला होता. त्यानंतर आता रियाबरोबरच तिच्या कुटुंबीयांचीही ईडीकडून चौकशी सुरु झाली आहे. गुरुवारी ईडीकडून वाकोल्याच्या अॅक्सिस बँकेच्या शाखेत 5 ते 6 तास रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची चौकशी झाली.

रियाच्या वडिलांच्या बँक खात्याचे स्टेटमेंट आणि लॉकरची माहिती ईडीनं घेतली. लॉकरमधील सामानाचं वजन करण्यासाठी ईडीने वेट मशिनही आणली. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांना इंद्रजित चक्रवर्तींनी फार माहिती दिली नसल्याचं कळते आहे. त्याचबरोबर आता रियाच्या जवळील लोकांनाही ईडी समन्स बजावू शकते.

मनी लाँड्रिंगवरुन ईडी ड्रग्जच्या अँगलवरुन NCB आणि क्राईमच्या नजरेतून CBI चा तपास जोरात सुरु झाला आहे. त्यामुळे सुशांतच्या मृत्यूसंदर्भात आपला कोणताही हात नसल्याचे रियाने म्हटले असलं, तरी तीन-तीन तपास यंत्रणा सत्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे.

Rhea Chakraborty On Sushant Singh Rajput

संबंधित बातम्या :

CBI Inquiry | सुशांतला कोणता आजार होता? सुशांतला कोणते ड्रग्स द्यायची? सीबीआयकडून रियावर प्रश्नांचा भडीमार

सुशांतकडून टॅलेंट मॅनेजर जया साहाच्या खात्यात 10 कोटी, ईडीकडून कसून चौकशी

सुशांतचा केअर टेकर सीबीआयच्या रडारवर, माफीचा साक्षीदार करण्यासाठी प्रयत्न?

Non Stop LIVE Update
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले