
Samantha Ruth Prabhu on Periods: अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आणि सडतोड वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता देखील समंथा हिने महिलांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या आणि अडचणींबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री मासिक पाळीबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मासिक पाळीबद्दल बोलताना आजही लाज आणि संकोच मनात का येतो?’ असा प्रश्न देखील अभिनेत्रीने यावेळी उपस्थित केला.
समंथा म्हणाली, ‘महिलांनी आता सर्वच स्तरात प्रगती केली आहे. महिला देखील आता पुढे आहेत. असं असताना मासिक पाळीबद्दल बोलताना मनात संकोच आणि लाज का वाटली पाहिजे… ‘, अभिनेत्रीने तिच्या पॉडकास्ट ‘टेक20’ च्या एका भागात पोषणतज्ञ राशी चौधरी यांच्याशी मासिक पाळी, सायकल सिंकिंग, एंडोमेट्रिओसिस आणि महिलांच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल संवाद साधला.
अभिनेत्री म्हणाली, ‘राशी चौधरी यांच्यासोबत बोलून मला एक गोष्ट कळली ती म्हणजे, जुन्या परंपरांना मागे ठेवणं किती गरजेचं आहे. आमची चक्रे मजबूत आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ती जीवनाला पुष्टी देणारी आहेत. ही लाज वाटावी किंवा लपवावी किंवा हलक्यात घ्यावी अशी गोष्ट नाही.’
पुढे समंथा मासिक पाळीबद्दल म्हणाली, ‘मासिक पाळी आपलं मन आणि शरीराला प्रभावित करते.अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याबद्दल आपण दरवर्षी शिकत राहिलं पाहिजं. राशी, तिच्या अनुभवामुळे आणि ज्ञानाच्या खोलीमुळे, गोष्टी स्पष्टपणे समजावून सांगण्याची पद्धत खूप स्पष्ट आहे. मला आनंद आहे की आम्ही एकत्र अशा चांगल्या संभाषणांमध्ये सहभागी होऊ शकलो जे खरोखर समजून घेण्यासाठी आवश्यक आहेत.’
समंथाच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘शुभम’ सिनेमाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. समंथा रुथ प्रभू निर्मित सिनेमाचा टीझर 7 एप्रिल रोजी अभिनेत्रीने प्रदर्शित केला आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे.
समंथा हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संथ्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.