सचिन पिळगांवकरांसोबत लग्न मोडलं, क्रिकेटरसोबत होतं अफेअर, लग्नाशिवाय दिला मुलीला जन्म, कोण आहे ती?

Bollywood Actress : आज आपण बॉलिवूडच्या अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, जी प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होती. तिचं कपिल देव यांच्यासोबत अफेअर होतं. जाणून घेऊया या अभिनेत्रीबद्दल.

| Updated on: Oct 05, 2026 | 6:03 PM
1 / 6
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, तिनं अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचं नाव क्रिकेटपटू कपिल देव यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. मात्र, या जोडप्यानं कधीही लग्न केलं नाही. नंतर, तिनं एका चित्रपट सुपरस्टारशी लग्न केलं. अभिनेत्रीला सचिन पिळगांवकर यांच्यासोबत लग्न करायचं होतं, पण अभिनेत्रीच्या आईमुळे हे लग्न होऊ शकलं नाही.

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, तिनं अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचं नाव क्रिकेटपटू कपिल देव यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. मात्र, या जोडप्यानं कधीही लग्न केलं नाही. नंतर, तिनं एका चित्रपट सुपरस्टारशी लग्न केलं. अभिनेत्रीला सचिन पिळगांवकर यांच्यासोबत लग्न करायचं होतं, पण अभिनेत्रीच्या आईमुळे हे लग्न होऊ शकलं नाही.

2 / 6

१९८० च्या दशकात कपिल देव रोमी देव यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही समस्यांमुळे त्यांचे मार्ग वेगळे झाले. नंतर, क्रिकेटपटूची भेट मनोज कुमार यांच्या पत्नीमार्फत अभिनेत्री सारिकासोबत झाली. दोघं एकमेकांना डेट करत होते. 'बॉलिवूड शादी'च्या वृत्तानुसार, क्रिकेटपटू आणि अभिनेत्री आधी मित्र होते आणि प्रेमात पडल्यानंतरच त्यांनी डेटिंग सुरू केलं.

3 / 6

त्यांच्या मित्रांनाही त्यांच्या नात्याबद्दल माहिती होती आणि त्यांना खात्री होती की, ते लवकरच लग्न करतील. सारिका क्रिकेटपटूच्या पालकांना भेटण्यासाठी पंजाबलाही गेली होती. मात्र, कपिल यांनी या नात्यापासून स्वतःला दूर केलं. नेमके काय चुकले हे दोघांपैकी कोणीही उघड केलेलं नाही. त्यानंतर कपिल यांनी रोमी भाटियाशी लग्न केलं.

4 / 6

5 / 6

सचिन आणि सारिका यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. पण, त्यांचं हे नातं सारिकाच्या आईला मान्य नव्हतं. या सगळ्याचा सारिकाच्या करिअरवर परिणाम होईल, असं अभिनेत्रीच्या आईला वाटायचं. त्यामुळे सारिका आणि सचिन यांच्या नात्यात दुरावा आला.

6 / 6

दरम्यान, काही काळानंतर सारिका आणि कमल हासन एकमेकांच्या प्रेमात पडले. सारिका लग्नाआधीच प्रेग्नन्ट होत्या. त्यांनी श्रुती हासनला जन्म दिल्यानंतर १९८८ मध्ये कमल हासनशी लग्न केलं. मात्र, सारिका आणि कमल यांनी २००२ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आणि २००४ मध्ये तो मंजूर झाला. आता ते वेगळे राहतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us