
Actress Life: बॉलिवूडमध्ये आज अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचं कुटुंब इंडस्ट्रीमधील नाही, पण त्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली आहे. अनेक अभिनेत्रींना तर कुटुंबाकडून पाठिंबा देखील मिळाला नाही. पण त्यांनी माघार घेतली नाही. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. झगमगत्या विश्वात अशीच एक अभिनेत्री आहे, जिने वडिलांच्या विरोधात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि आज कोट्यवधींची मालकीण आहे.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी एका हॉटेलमध्ये काम करत होती. . हॉटेलमध्ये काम करत असताना तिच्या मनात सिनेमांप्रति प्रेम निर्माण झालं आणि अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आणि आज तिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री वाणी कपूर आहे.
बॉलिवूडमध्ये करीयर करण्यासाठी वाणीला तिच्या वडिलांकडून कधीच पाठिंबा मिळाला नाही. वडिलांच्या विरोधात तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. आईने मात्र लेकीची साथ सोडली नाही. वाणीने मॉडेलिंग केलेलं देखील अभिनेत्रीच्या वडिलांना आवडत नव्हतं… पण वाणीने वडिलांच्या रागाला सामोरं जात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि स्वप्न पूर्ण केलं.
शिवाय ‘चंडीगढ़ करे आशिकी’ सिनेमात वाणीने अशा मुलीची भूमीका साकारली, जी लिंग बदल करुन मुलगी होते… आज वाणीला कोणत्या ओळखीची गरज नाही. सांगायचं झालं तर, ‘शुद्ध देसी रोमान्स’ सिनेमानंतर वाणीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये वाणी कपूरची संपत्ती सुमारे 10 कोटी रुपये होती. नेटवर्थपीडियानुसार, वाणी सुमारे 375 दशलक्ष रुपयांच्या मालमत्तेची मालकीण आहे. दिल्ली आणि मुंबईत अभिनेत्रीतं स्वतःचं घर आहे. याशिवाय अनेक महागड्या गाड्याही आहेत. सिनेमा आणि जाहिरातींच्या माध्यमातून वाणी कोट्यवधींची माया कमावते. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अभिनेत्री कमाई करते.
सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.