AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

500 वर्षांपूर्वीचा हिंदूंचा काल्पनिक छळ… म्हणणाऱ्या अभिनेत्रीचं दुसरं ट्विट, शिवछत्रपतींबद्दल काय म्हणाली?

काल्पनिक सिनेमात 500 वर्षांपूर्वी हिंदूंवर होणारा अत्याचार, छळ..., असं म्हणणाऱ्या अभिनेत्रीचं आणखी एक ट्विट तुफान व्हायरल, आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणाली अभिनेत्री? पोस्ट तुफान व्हायरल...

500 वर्षांपूर्वीचा हिंदूंचा काल्पनिक छळ... म्हणणाऱ्या अभिनेत्रीचं दुसरं ट्विट, शिवछत्रपतींबद्दल काय म्हणाली?
| Updated on: Feb 22, 2025 | 11:44 AM
Share

अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमा सध्या तुफान चर्चेत आहे. चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. ‘छावा’ सिनेमा अनेक नवे विक्रम रचत असताना सलेब्रिटी आणि राजकारणी व्यक्ती देखील सिनेमाचं कौतुक करताना दिसत आहे. दरम्यान अभिनेत्री स्वरा भास्कर हिने देखील एक ट्विट केलं होतं. स्वराने या ट्विटमध्ये थेट ‘छावा’चा उल्लेख केला नसला तरी तिच्या ट्विटमधील चित्रपटाचा संदर्भ हा ‘छावा’चाच असल्याचं स्पष्ट होत आहे.

ट्विटनंतर वाद निर्माण झाल्यानंतर स्वरा भास्कर हिने आणखी एक ट्विट केलं आहे, आता अभिनेत्रीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री ट्विट करत म्हणाली, ‘माझ्या ट्विटमुळे अनेक वाद आणि दुर्लक्ष करता येणारे गौरसमज निर्माण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचा आणि त्यांच्या योगदानाचा मी निःसंशयपणे आदर करते. विशेषतः महाराजांच्या मनात असलेला महिलांबद्दलचा आदर…’ पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘इतिहासाचा गौरव करणं ही नक्कीच चांगली गोष्ट आबे. पण आजचं आपलं अपयश लवण्यासाठी भूतकाळातील वैभवाचा गैरवापर करू नका. एतिहासिक समजुतीचा वापर हा कायम लोकांना एकत्र आणण्यासाठी व्हायला हवा… सध्याच्या मुद्द्यांवर लक्ष विचलित करण्यासाठी याचा वापर केला जाऊ नये…’

जुन्या ट्विटबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या मागील ट्विटमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर, मी खंत व्यक्त करते. मला माझ्या इतिहासाचा अभिमान आहे, जसा इतर नागरिकांना आहे… इतिहासाने आपल्याला एकत्र आणलं पाहिजे आणि भविष्यात लढण्यासाठी ताकद दिली पाहिजे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

स्वरा भास्कर हिने पूर्वी केलेलं ट्विट

गुरुवारी स्वरा भास्कर हिने एक ट्विट कले होतं. ज्यामध्ये अभिनेत्रीने इतिहास आणि महाकुंभबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘एका सुशोभित आणि काल्पनिक चित्रपटात 500 वर्षांपूर्वी हिंदूंवर होणारा अत्याचार पाहून लोक संतापलेले दिसत आहेत. परंतु महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी आणि गैरव्यवस्थापनावर होणारे भयानक मृत्यू आणि जेसीबी बुलडोझरने मृतदेह उचलण्याबद्दल ते गप्प आहेत. हा समाज मेंदू आणि आत्म्याने मृत झालेला समाज आहे..’ असं अभिनेत्री ट्विट करत म्हणाली होती.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.