
अभिनेत्री श्रेया गुप्ताने सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नुकताच एका मुलाखतीमध्ये तिने खासगी आयुष्यावर वक्तव्य केले. बंगाली कुटुंबातली श्रेया चेन्नईत लहानाची मोठी झाली आणि तिने आपल्या करिअरची सुरुवात तमिळ चित्रपटांमधून केली. सुरुवातीला तिला वाईट अनुभव आला.

श्रेयाला ते दिवस आठवले जेव्हा ती चांगल्या भूमिका मिळविण्यासाठी धडपडत होती. 'मला चेन्नईमध्ये कास्टिंग काउचचा सामना करावा लागला. त्यावेळी कास्टिंग डायरेक्टर नव्हते. म्हणूनच मला मुंबईत येऊन नशीब आजमावायचे होते. मला मुंबईत कधीच अशा प्रकारचा सामना करावा लागला नाही' असे श्रेया म्हणाली.

या भीषण घटनेची आठवण करून देताना ती म्हणाली, 'वर्ष 2014 मध्ये मी एका दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये ऑडिशनसाठी गेले होते. पूर्वी फक्त दिग्दर्शक आणि निर्मातेच ऑडिशनसाठी बोलावायचे.'

ती पुढे म्हणाली, 'मी माझ्या आईसोबत गेले होते. मध्ये गेल्यावर दिग्दर्शकाने मला मांडीवर बसायला सांगितले आणि सीन करून दाखवायला सांगितला. तेव्हा मी खूप लहान होते. या ऑडिशननंतर मी अस्वस्थ झाले होते. मी दिग्दर्शकाला उद्या येते आणि सीन दाखवते असे म्हटले. मी तेथून पळून आले.'

श्रेयाने सांगितले की, त्या घटनेनंतर तिला समजले की एवढा अभ्यास करूनही जर अशा परिस्थितीचा सामना करावा लागला तर मुंबईतच नशीब आजमावेलेले बरे. मात्र, आता साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये परिस्थिती चांगली झाल्याचे अभिनेत्रीचे म्हणणे आहे.