
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री यामी गौतमनं नुकतंच लग्न गाठ बांधली आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत तिनं चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली.

यामी गौतमने दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले आहे. आदित्य ‘उरी’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.

तर आता यामीनं आणखी काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मेहेंदी सोहळ्याचे हे फोटो आहेत.

पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन यामीनं अगदी साध्या पद्धतीनं या कार्यक्रम केला आहे.

‘हे प्रिय, काळजी कशाला? आपल्यासाठी जे आहे ते नेहमीच आपल्याला मिळेल.’ असं सुंदर रोमँटिक कॅप्शनसुद्धा तिनं या फोटोला दिलं आहे.