Tanushree Dutta On Nana Patekar : तनुश्री दत्ता तुझ्यासारख्या लोकांमुळे..नाना पाटेकरांबद्दल वादग्रस्त बोलणाऱ्या तनुश्री विरोधात बॉलिवूडमधील मोठ्या संघटनेने घेतली भूमिका
Tanushree Dutta On Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल कळल्यानंतर तनुश्री दत्ताने आधी इन्स्टाग्रामवर प्रतिक्रिया दिलेली. "बातमी समजली आहे, पण लखनऊमधल्या वर्क इवेंटवर मला फोकस करायचा आहे. संध्याकाळपर्यंत मिडिया ‘इविल डेड’ मध्ये इंटरेस्ट घेईल" असं तिने म्हटलेलं.

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने सगळेच हळहळले आहेत. सगळ्यांसाठीच हा मोठा शॉक आहे. नाना पाटेकर आज आपल्यात नाहीत यावर कोणाला विश्वास बसत नाहीय. नाना पाटेकर हा माणूस फक्त सिनेमापुरता मर्यादीत नव्हता. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक जीवनावर नाना पाटेकर यांनी आपली छाप उमटवली होती. लोकांना ते ‘आपले नाना’ वाटायचे. त्यामुळे नाना पाटेकर यांच्या निधनामुळे अनेकांच्या मनात आपल्या जवळचा, हक्काचा माणूस सोडून गेलाय अशी भावना आहे. अपवाद फक्त अभिनेत्री तनुश्री दत्ताचा. नाना पाटेकर हयात असताना अभिनेत्री तनुश्री दत्ताने त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. आता नानांच्या निधनानंतरही तनुश्री थांबलेली नाही. नाना आज आपल्यात नाहीत. त्यांनी या जगाचा निरोप घेतल्यानंतरही तनुश्रीने त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.
नाना पाटेकर यांच्याबद्दल तनुश्री दत्ताने केलेल्या या वक्तव्यांचा ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) निषेध केला आहे. नानांच्या निधनानंतर तनुश्री दत्ता सोशल मीडियावर त्यांना ‘इविल डेड’ म्हणाली. त्यावर AICWA ने कठोर भूमिका घेतली आहे. नानांच्या निधनानंतर तनुश्री अशी वक्तव्य करुन स्वस्तातली पब्लिसिटी मिळवतेय असं AICWA चे संस्थापक आणि अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी म्हटलं आहे.
हे माणुसकीच्या विरोधात
“नाना पाटेकर हे देशातील एक सन्मानित व्यक्ती होते. त्यांनी देशासाठी कार्य केलेलं. आज संपूर्ण देश, देशाच्या पंतप्रधानांपासून सर्वसामान्य नानांच्या निधनामुळे शोकसागरात बुडाले आहेत. सर्वजण नानांच्या आठवणीत बुडाले आहेत. तनुश्री दत्ताने चीप पब्लिसिटी नाना पाटेकरांना ईविल डेड म्हटलं आहे. भारताच्या इतिहासात कोणीही एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर अशा प्रकारचा शब्द प्रयोग केलेला नाही, जे काम तनुश्री दत्ताने केलय. AICWA या विरोधात आहे. कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर असे शब्द वापरणे हे माणुसकीच्या विरोधात आहे” असं AICWA ने म्हटलय.
कोणाला तुझ्यामध्ये इंटरेस्ट नाही
“तनुश्री दत्ता तुला लंडनला जायचं असेल जा, लखनऊला जायचं असेल जा..लाइव्ह करायचं आहे कर..कोणाला तुझ्यामध्ये इंटरेस्ट नाही. पण नानांबद्दल जाणून घेण्यात सगळ्या भारताला इंटरेस्ट आहे. तुझ्यासारख्या लोकांमुळे सगळ्या भारताच्या फिल्म इंडस्ट्रीचं नाव खराब होतय. नाना एक उत्तम अभिनेते होते. त्यांनी स्वबळावर ओळख बनवली” असं AICWA ने म्हटलय.